महाराष्ट्र

maharashtra

Nagpur Crime News : अनैतिक संबंधाच्या संशयातून होमगार्डची हत्या, आरोपीला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 6:10 PM IST

Updated : Oct 11, 2023, 6:27 PM IST

Nagpur Crime News : पत्नीचे होमगार्डसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका 27 वर्षीय होमगार्डची हत्या (Husband Killed Youth) करण्यात आली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील बोर्डा शिवारात घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Nagpur Crime News
अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या

नागपूर Nagpur Crime News : राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक वादातून होणाऱ्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या बोर्डा शिवारात एका २७ वर्षीय होमगार्ड जवानाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. होमगार्डची हत्या (Homeguard killed) त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने केल्याची माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधातून होमगार्डची हत्या (Husband Killed Youth) झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतक होमगार्डचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत अशी शंका आरोपीला आली होती. त्यातून त्याने ही हत्या केल्याचं तपासात पुढे आलं आहे.

पत्नीचे होते अनैतिक संबंध : होमगार्डचा मृतदेह मंगळवारी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या बोर्डा शिवारात आढळून आला होता. होमगार्डची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला असल्याने, कन्हान पोलिसांनी (kanhan police) तपासाला सुरुवात केली. मृतक हा होमगार्ड जवान असल्यानं पोलिसांनी हे प्रकरण अधिकच गंभीरपणे घेतलं आहे. पोलिसांनी होमगार्ड संदर्भात माहिती घेतल्यास अनैतिक संबंधाची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना समजली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. होमगार्ड आणि आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. असा खुलासा आरोपीनं पोलीस तपास दरम्यान केला आहे.



कौटुंबिक वादातून नागपुरात नवऱ्यानं केली बायकोची हत्या : याआधीही अशीच एक घटना घडली होती.नागपूरात नवऱ्याने घरगूती वादातून बायकोची हत्या केलीय, तर बीडमध्ये बापानेच आपल्या पत्नी व मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातील खापरखेडा येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. रंजना मनोहर मनघटे (५०) असं हत्या झालेल्या महिलेचं नावं होतं.


हेही वाचा -

  1. Nagpur Crime News: राज्याच्या उपराजधानीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, 24 तासांत तिघांची हत्या
  2. Nagpur Crime News : धक्कादायक ! २४ तासात जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनेत चौघांची हत्या
  3. Daughter Killed Mother in Law : सासू-सुनेचं भांडण टोकाला; सुनेनं केली वयोवृद्ध सासूची हत्या
Last Updated : Oct 11, 2023, 6:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details