महाराष्ट्र

maharashtra

Murder Case : नागपूर महिला हत्या प्रकरण; मध्यप्रदेशातील आमदाराची होणार चौकशी

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 8:12 PM IST

Updated : Aug 22, 2023, 8:19 PM IST

नागपूरच्या हायप्रोफाईल महिला खून प्रकरणात एकापाठोपाठ एक अटकेचे सत्र सुरुच आहे. या खून प्रकरणात नागपूर पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. त्यामुळे याप्रकरणातील आरोपींची संख्या पाच झाली आहे.

Murder Case
आरोपीला अटक

माहिती देताना पोलीस उपायुक्त,राहुल मदने

नागपूर :नागपूर येथील स्थानिक माहिला हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येनंतर आरोपीला मदत करण्याच्या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटक आरोपींची संख्या ही पाच झाली आहे.

एकूण आरोपी संख्या पाच : आरोपींचे मोबाईल लपविण्यासाठी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. एकूण पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना २५ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.



आमदारांला चौकशीसाठी बोलावले : आता हत्या प्रकरणाच्या तपासाला गती येत असून, नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेश मधील एका आमदाराला चौकशीसाठी समन्स बजावला आहे. उद्या पोलीस चौकशीला आमदाराला उपस्थित राहावे लागेल.


हत्येसोबतचे सेक्सटॉर्शनचा तपास सुरू :हत्या झालेल्या या महिलेचा मृतदेह अद्याप मिळालेला नसला तरी, आरोपी आणि त्याचे उर्वरित दोन साथीदार नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. या दरम्यान आरोपींनी या महिलेवर सेक्सटॉर्शनसाठी दबाव आणून अनेक मोठ्या नेत्यांसह काही व्यापारांना ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.

मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली :याआधी या प्रकरणातील मुख्य आरोपीनेच तिच्या हत्येची कबुली दिली होती. हत्या करून मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली होती.

दोघांत कडाक्याचे भांडण :या घटनेत आरोपी आणि खून झालेली महिला या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. शेजाऱ्यांनाही भांडणाचा आवाज गेला होता. त्यानंतर मात्र थोड्या वेळात आवाज येणे बंद झाले. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्या व्यक्तीचा कुणाशीही संपर्क झाला नाही. त्याचदिवशी आरोपी फरार झाला. या दोघांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र त्यांच्यात वाद असल्याने ती महिला आरोपीसोबत राहात नव्हती.

हेही वाचा -

  1. Palghar Crime : आईवर कुऱ्हाडीने वार करून अल्पवयीन मुलाकडून खून, तपासात सांगितले धक्कादायक कारण
  2. Truck Driver Murder : ट्रकमधील माल पळविण्यासाठी ट्रकचालकांनी साथीदाराचाच केला खून; कटाचा 'अशाप्रकारे' उलगडा
  3. Murder in Thane : ठाण्यात गँगवॉर? प्रतिस्पर्धी टोळीकडून अल्पवयीन गुन्हेगाराचे अपहरण करून खून
Last Updated : Aug 22, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details