महाराष्ट्र

maharashtra

पारंपरिक सणांचा रंग बदलतोय; बैलांऐवजी ट्रॅक्टर पोळा

By

Published : Aug 31, 2019, 9:40 AM IST

ट्रॅक्टरला हारफुलांनी सजवून विधिवत पूजा करण्यात येते. पोळा सणानिमित्त जवळपास ते 25-30 ट्रॅक्टर एका ठिकाणी आणून ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला.

नागपूरमध्ये बैलां ऐवजी ट्रॅक्टर पोळा

नागपूर -जिल्ह्यातील कन्हान जवळ असलेल्या खोपडी गावात चक्क ट्रॅक्टरचा पोळा भरवण्यात आला. पारंपरिक बैल पोळ्याच्या परंपरेला मूठमाती देत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा पोळा भरवला.

नागपूरमध्ये बैलां ऐवजी ट्रॅक्टर पोळा

भारतात प्राचीन काळापासून शेतीचा एक हंगाम संपल्याचा आनंद म्हणून बैल पोळ्याचा सन साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने पोळा साजरा केला जातो. मात्र, आता बदलेल्या काळात बैलांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. आधुनिक युगात आज बैलांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर करून शेतीची मशागत केली जाते. आता बैलांसोबतच ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे. याच बदलत्या पद्धतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खोपडी गावात ट्रॅक्टरचा पोळा आयोजित करण्यात आला होता. 2015 पासून ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्यात येतो. यावेळी ट्रॅक्टरला हारफुलांनी सजवून विधिवत पूजा करण्यात येते. पोळा सणानिमित्त जवळपास ते 25-30 ट्रॅक्टर एका ठिकाणी आणून ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट ट्रॅक्टर मालकाला सम्मानीत करण्यात आले.

Intro:नागपूर जिल्ह्यातील कन्हान जवळ असलेल्या खोपडी गावात चक्क ट्रॅक्टरच्या पोळा भरवण्यात आला...पारंपरिक बैल पोळ्याच्या परंपरेला मूठमाती देत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या पोळा भरवलाBody:भारतात प्राचीन काळापासून शेतीचा एक हंगाम संपल्याचा आनंद म्हणून बैल पोळ्याच्या सन साजरा केला जातो.... शेतकऱ्यांच्या मित्र असलेला बैलांचे ऋण फेडण्याचा उद्देशाने पोळा साजरा केला जातो... परंतु आता बदलेल्या काळात बैलांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे... आधुनिक युगात आज बैलांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर करून शेतीची मशागत केल्या जाते... आता बैलांसोबतच ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे.... याच बदलत्या पद्धती मध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खोपडी गावात ट्रॅक्टर चा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते... 2015 पासून ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्यात येतो... यावेळी ट्रॅक्टरला हारफुलांनी सजवून विधिवत पूजा करण्यात येते... पोळा निमित्त खोपडी इथे जवळपास ते 25-30 ट्रॅक्टर एका ठिकाणी आणून ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला व उत्कृष्ट ट्रॅक्टर मालकाला सम्मानीत करण्यात आले.

बाईट -- संजय सत्येकार (शेतकरी)Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details