महाराष्ट्र

maharashtra

Nitin Gadkari Threat Case To NIA: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खंडणीची धमकी; 'एनआयए' करणार प्रकरणाचा तपास

By

Published : May 8, 2023, 3:28 PM IST

Updated : May 8, 2023, 5:05 PM IST

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात दोन महिन्यात दोन वेळा फोन धमकीचे फोन आले आणि खंडणी मागितली गेली. या प्रकरणाचा तपास 'राष्ट्रीय तपास यंत्रणा' म्हणजेच 'एनआयए' करणार असल्याची माहिती आहे.

Nitin Gadkari Threat Case To NIA
गडकरी धमकी प्रकरण एनआयएकडे

नागपूर: याप्रकरणी नागपूर पोलिसांनी कर्नाटकच्या बेळगाव कारागृहात शिक्षाबंदी असलेला जयेश पुजारी उर्फ कांता याला अटक केली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने पहिल्यांदा जानेवारी महिन्यात 100 कोटी आणि दुसऱ्यांदा मार्च महिन्यात फोन करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यावेळी जयेश पुजारीने बेळगाव तुरुंगातून फोन केले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्चला जयेश पुजारीला बेळगाव तुरुंगातून अटक करून नागपुरात आणले.

पुजारीचे दहशदवाद्यांशी संबंध: चौकशी दरम्यान जयेश पुजारीचा संबंध दहशतवादी आणि मोठ्या गँगस्टरसोबत असल्याचे तपासात समोर आले. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीवर 'युएपीए' अंतर्गत गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृह खात्याला दिला. त्यानंतर केंद्रीय गृह खात्याने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी 'एनआयए'ला देण्यास संमती दिली. त्यामुळे 'एनआयए'ची एक चमू नागपुरात येऊन या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे लवकरच हाती घेणार अशीही माहिती आहे.


कोण आहे जयेश कांथा उर्फ पुजारी?केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जयेश कांथा नामक एका कुख्यात गुंडाचा सहभाग आढळून आला. तो बेळगाव कारागृहात कैद होता. त्याला 2016 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली आहे.


जयेशच्या डायरीत सापडले होते अनेक नंबर:जयेश कांथावर कारागृहातून पळून जाण्याचा गुन्हा दाखल असून खंडणी मगितल्याचा त्याचा जुना रेकॉर्ड आहे. पहिल्यांदा त्याने नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यासाठी धमकीचा फोन केला होता. त्यावेळी नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे एक डायरी सापडली होती. त्यात अनेक 'व्हीआयपी' लोकांचे फोन नंबर असल्याचे तपासात पुढे आले आहे.

हेही वाचा:Maharashtra Politics Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 'या' आठवड्यात? सर्वांची उत्कंठा शिगेला

हेही वाचा:Nitish Kumar News : नितीश कुमार येणार मुंबईच्या दौऱ्यावर... शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची भेट घेणार

Last Updated : May 8, 2023, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details