महाराष्ट्र

maharashtra

'मोदी गॅरंटी आहे', लवकरच अखंड हिंदुस्थानचं स्वप्न देखील पूर्ण होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 8:06 PM IST

Eknath Shinde On PM Modi : अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) व्हावे, हे कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नेहमी म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान बनवा मी दोन कामं प्राधान्याने करीन एक म्हणजे अयोध्येत राम मंदिर बांधणे आणि दुसरे काश्मीरमधून ३७० कलम हटवेन. बाळासाहेबांची ही दोन्ही स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पूर्ण केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलीय.

Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूरEknath Shinde On PM Modie: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं स्वप्न होतं की, अखंड हिंदुस्तानसाठी काश्मीर मधील ३७० कलम हटवलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ३७० कलम हटवलं आणि अयोध्येत राम मंदिर बांधलं (Ayodhya Ram Mandir) खरं म्हणजे मोदी यांना धन्यवाद दिले पाहिजे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेबाहेर प्रतिक्रिया दिलीय. तसंच त्यांनी कलम 370 वैध ठरवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद दिले.

अखंड हिंदुस्तानाचं स्वप्न पूर्ण होईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालीचं अमित शाह यांनी 370 कलम हटवण्यासाठी जे काम केलं ते लोकांच्या मनातलं एक स्वप्न पूर्ण झालंय. स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब असतील यांचं स्वप्न होतं अखंड हिंदुस्तान असावा. हे स्वप्न या देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी पूर्ण केलंय. त्यांनी देशाचं नाव संपूर्ण जगभरात उंच केलंय, ते नक्कीच अखंड हिंदुस्तानासाठी पूर्ण प्रयत्न करतील आणि ते एकदा बोलले म्हणजे बोलले. मोदी गॅरंटी ही या नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या निवडणुकांमध्ये दिसली आहे.



तुम्हाला कोणता मुख्यमंत्री हवा : ठाकरे कुटुंबावर टीका करताना ते म्हणाले की, त्यांनी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला आहे. एवढंच नाही तर मुंबईच्या विकासावर बुलडोझर फिरवला. मी दिल्लीला गेलो, तेलंगणाला गेलो, शेती करायला गावी गेलो किंवा बीचवर सफाई करायला गेलो की, यांना त्रास होतो. मी महाराष्ट्रातल्या जनतेला विचारतो, तुम्हाला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे का? दिल्ली ते गल्लीपर्यंत सगळीकडे फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, फिल्डवर उतरून काम करतो घरी बसत नाही. फेसबुक लाईव्हवर काम करत नाही. तसेच हे सरकार फडतूस आहे का, हे तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये कळाले आहे.


अवसान गळलेला हा विरोधी पक्ष : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनमध्ये कॉन्फिडन्स गमावलेला, अवसान गळलेला हा विरोधी पक्ष आहे. त्यामुळं त्यांना आम्हाला फडतूस म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. एवढंच काय तर नवाब मलिकां संदर्भात त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.



शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय गंभीर आहे. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांच्या मागे हे सरकार उभं राहिलं आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये शेतकऱ्यांना 12 हजार कोटी पेक्षा जास्तीची मदत आपल्या सरकारने केली आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. शेतावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आतापर्यंत राज्यांमध्ये जे जे नुकसान झालं अवकाळी, गारपीट आणि अतिवृष्टीमुळं या सगळ्याना युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं.

हेही वाचा -

  1. दीड वर्षात शेतकऱ्यांना १० ते १२ हजार कोटी दिले आहेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  2. आमदार अपात्र प्रकरण: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी पूर्ण, सोमवारी दीपक केसरकर यांचा नंबर
  3. इथेनॉल बंदी, कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी?

ABOUT THE AUTHOR

...view details