महाराष्ट्र

maharashtra

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची पीछेहाट तर काँग्रेसकडे एक हाती सत्ता

By

Published : Jan 9, 2020, 1:11 PM IST

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता. त्याचे अपेक्षित यश काँग्रेसला मिळाले. नागपूर जिल्हा परिषदेवर गेल्या काही वर्षांपासून भाजप व मित्रपक्षांची सत्ता होती. भाजपच्या मित्रपक्षात शिवसेनेचाही समावेश होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेना युती तुटली व शिवसेना, राष्ट्र्रवादी व काँग्रेस असे महाविकास आघाडीचे नवे समीकरण राज्यात अस्तित्वात आले.

congress-won-30-seat-in-zp-election-in-nagpur
congress-won-30-seat-in-zp-election-in-nagpur

नागपूर-जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने भारतीय जनता पक्षाला धक्का देत बहुमत मिळवले आहे. काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेच्या ५८ जागांपैकी ४३ जागांवर विजय प्राप्त केला. तर भाजपला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत स्वबळावर लढलेली शिवसेना केवळ एका जागेवर विजयी झाली.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची पीछेहाट तर काँग्रेसकडे एक हाती सत्ता

हेही वाचा-जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर.. पाहा, कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता. त्याचे अपेक्षित यश काँग्रेसला मिळाले. नागपूर जिल्हा परिषदेवर गेल्या काही वर्षांपासून भाजप व मित्रपक्षांची सत्ता होती. भाजपच्या मित्रपक्षात शिवसेनेचाही समावेश होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-सेना युती तुटली व शिवसेना, राष्ट्र्रवादी व काँग्रेस असे महाविकास आघाडीचे नवे समीकरण राज्यात अस्तित्वात आले. राज्यात या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र लढली. पण शिवसेनेला या निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. सेनेच्या ७ जागा कमी झाल्या. जिल्हा परिषद निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांचा जोरदार प्रचार देखील केला. परंतु, गडकरी व बावनकुळे यांना धक्का बसला आहे. गडकरींचे मूळगाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे तर बावनकुळे यांचे मुळगाव कोराडी येथून काँग्रेसचे नाना कंभाले विजयी झाले. काँग्रेस आघाडीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला.
गेल्या वेळच्या तुलनेत पक्षांची सद्यस्थिती-

पक्ष 2012 2019
काँग्रेस 19 30
राष्ट्रवादी 7 10
भाजप 21 15
शिवसेना 8 1
शेकाप 0 1
स्वतंत्र 0 1
बसप 0 1


या निवडणुकीत दोन नेतापुत्रांचाही विजय झाला आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत हिंगणा तालुक्याच्या रायपूर गटातून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री रमेश बंग यांचे चिरंजिव दिनेश बंग विजयी झाले. दिनेश बंग यांनी भाजप उमेदवार विकास धाबेकर यांचा सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला घवघवीत यश मिळाले असून नेतापुत्रांनी देखील विजय प्राप्त केला आहे. काटोल तालुक्यातील मेटपांजरा गटातून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजिव सलील देशमुख यांनी भाजपचे प्रवीण अडकिने यांचा सुमारे साडेचार हजार मतांनी प्रभाव केला. विकासकामांना पुढे नेण्याचा संकल्प विजय प्राप्त केलेल्या दिनेश बंग यांनी बोलून दाखवला.

काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती असे असले तरी काँग्रेसने बहुमताचा आकडा स्वबळावर प्राप्त केल्याने अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार हे निश्चित आहे. असे असले तरी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सांगितले आहे. सावनेर, कळमेश्वर, नरखेड, हिंगणा व नागपूर ग्रामीण तालुक्यात भाजपचे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेला ७ जागा गमवाव्या लागल्या तर गेल्या निवडणुकीत ३ जागा प्राप्त करणाऱ्या बहुजन समाज पक्षाने यंदा निवडणूक लढवली नव्हती. एकुणच नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने दमदार एंट्री करीत सत्ता संपादन केली आहे.

Intro:नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने भारतीय जनता पक्षाला धक्का देत बहुमत प्राप्त केले... काँग्रेस आघाडीने जिल्हा परिषदेच्या ५८ जागांपैकी ४३ जागांवर विजय प्राप्त केला तर भाजपला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले... निवडणुकीत स्वबळावर लढलेली शिवसेना केवळ एका जागेवर विजयी झाली.
Body:जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता... त्याचे अपेक्षित यश काँग्रेसला मिळाले... नागपूर जिल्हा परिषदेवर गेल्या काही वर्षांपासून भाजप व मित्रपक्षांची सत्ता होती... भाजपच्या मित्रपक्षात शिवसेनेचाही समावेश होता... मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजप - सेना युती तुटली व सेना-राष्ट्र्रवाडी व काँग्रेस असे महाविकास आघाडीचे नवे समीकरण राज्यात अस्तित्वात आले... राज्यात या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी शिव सेना नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र लढली... पण शिव सेनेला या निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त झाले नाही व सेनेच्या ७ जागा कमी झाल्या.... जिल्हा परिषद निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती... ज्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांचा जोरदार प्रचार देखील केला... परंतु गडकरी व बावनकुळे यांना धक्का बसला आहे... गडकरींचे मूळगाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे तर बावनकुळे यांचं मुळगाव कोराडी येथून काँग्रेसचे नाना कंभाले विजयी झाले... काँग्रेस आघाडीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयानंतर जल्लोष साजरा करण्यात आला.




गेल्या वेळच्या तुलनेत पक्षांची सद्यस्थिती --

पक्ष 2012 2019
काँग्रेस 19 30 +11
राष्ट्रवादी 7 10 +3
भाजप 21 15 -6
शिवसेना 8 1 -7
बसप 3 0 -3
शेकाप 0 1 +1
स्वतंत्र 0 1 +1

या निवडणुकीत दोन नेतापुत्रांचाही विजय झाला आहे... नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत हिंगणा तालुक्याच्या रायपूर गटातून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री रमेश बंग यांचे चिरंजिव दिनेश बंग विजयी झाले... दिनेश बंग यांनी भाजप उमेदवार विकास धाबेकर यांचा सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला... नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला घवघवीत यश मिळाले असून नेता पुत्रांनी देखील विजय प्राप्त केला आहे... काटोल तालुक्यातील मेटपांजरा गटातून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजिव सलील देशमुख यांनी भाजपचे प्रवीण अडकिने यांचा सुमारे साडेचार हजार मतांनी प्रभाव केला... विकासकामांना पुढे नेण्याचा संकल्प विजय प्राप्त केलेल्या दिनेश बंग यांनी यावेळी बोलून दाखवला. ..काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती असे असले तरी काँग्रेसने बहुमताचा एकदा स्वबळावर प्राप्त केल्याने अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार हे निश्चित आहे... असे असले तरी घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील वाटचाल ठरवणार असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सांगितले आहे...सावनेर,कळमेश्वर,नरखेड,हिंगणा व नागपूर ग्रामीण तालुक्यात भाजपचे नुकसान झाले आहे... या निवडणुकीत शिवसेनेला ७ जागा गमवाव्या लागल्या तर गेल्या निवडणुकीत ३ जागा प्राप्त करणाऱ्या बहुजन समाज पक्षाने यंदा निवडणूक लढवली नव्हती... एकूणच नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने दमदार एंट्री करीत सत्ता संपादन केली आहेConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details