महाराष्ट्र

maharashtra

महापालिकेच्या कचरा गाडीतून गोवंशीय मास पडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू; नागपुरातील प्रकार

By

Published : Aug 14, 2019, 10:33 PM IST

नागपूर महापालिकेच्या कचरा गाडीतून एकानंतर एक गायीचे कापलेले शीर आणि शरीराच्या इतर भागाचे अवयव पडले. गोवंशीय प्राण्यांचे अवशेष रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना कळमना उड्डाणपुलानजीक घडली. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेची दृश्ये पाहून अनेक जण हादरुन गेले होते.

गोवंशीय मास

नागपूर- महापालिकेच्या धावत्या कचरा गाडीतून गोवंशीय प्राण्यांचे अवशेष रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कपिलनगर भागातील कळमना उड्डाणपुलानजीक ही घटना घडली. यावर आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेने महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गौ तस्करांशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेची दृश्ये पाहून अनेक जण हादरुन गेले होते.

गोवंशीय मास पडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु

महापालिकेची कचरा गाडी कामगारनगरातून कचरा उचलून भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या दिशेने जायला निघाली. दरम्यान कचरा गाडीतून एकानंतर एक गायीचे कापलेले शीर आणि शरीराच्या इतर भागाचे अवयव पडले. सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत हे अवशेष रस्त्यावर विखुरल्या गेले. तिथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांनी या संदर्भात कचरा गाडी चालवणाऱ्या चालकाला जाब विचारला. मात्र, कचरा गाडीच्या चालकाने हा संपूर्ण कचरा त्याने कामगारनगर भागातून उचलला असून त्यापलीकडे कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर दिले. काहींनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबतची सूचना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची तक्रार जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये दिली.

पोलिसांनी प्राथमिक तपास करत (रस्त्यावर पडलेले तुकडे गायचेच असल्याची खात्री झाल्यानंतर) या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गौ वंशीय प्राणी हत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तसेच आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरम्यान या प्रकरणावरून राजकारणही सुरु झाले आहे. प्रवीण तोगडिया प्रणित आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांवर गौ हत्येच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिषदेने केला आहे. या प्रकरणी महापालिकेसाठी कचरा उचलणाऱ्या खाजगी कंपनी कनक रिसोर्सेसच्या काही कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवले. तसेच गौ रक्षकांनी त्यांच्यावर गौ तस्करांसोबत संगनमत करत कत्तल केलेल्या गोवंशीय प्राण्यांचे अवशेष नष्ट करण्याचा आरोप केला आहे.

Intro:नागपुरातील कपिलनगर भागात कळमना फ्लायओव्हर जवळ महापालिकेच्या धावत्या कचरा गाडीतून गोवंशीय प्राण्यांचे अवशेष रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे... महापालिकेच्या तक्रारीवर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे... मात्र, आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गौ तस्करांशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे.

Body:नागपूरच्या कपिलनगर परिसरात कळमना फ्लायओव्हर जवळ सोमवारी संध्याकाळी रस्त्यावर ही दृश्ये पाहून अनेक जण हादरून गेले.... कामगारनगरातून कचरा उचलून भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या दिशेने निघालेल्या महापालिकेच्या या कचरा गाडीतून एकानंतर एक गायीचे कापलेले मुंडके आणि इतर शारीरिक अवयव पडले होते... सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत हे अवशेष रस्त्यावर विखुरले गेले... तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांनी या संदर्भात कचरा गाडी चालवणाऱ्या चालकाला जाब विचारला... मात्र, कचरा गाडीच्या चालकाने हा संपूर्ण कचरा त्याने कामगारनगर भागातून उचलला असून त्यापलीकडे कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर दिले... लोकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली... घटनेचे गांभीर्य ओळखून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची तक्रार जरीपटका पोलीस स्टेशन मध्ये दिली... पोलिसांनी ही प्राथमिक तपास करत ( रस्त्यावर पडलेले तुकडे गायचेच असल्याची खात्री झाल्यानंतर ) या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गौ वंशीय प्राणी हत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे....दरम्यान या प्रकरणावरून राजकारणही सुरु झाले आहे... प्रवीण तोगडिया प्रणित आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत पोलिसांवर गौ हत्येच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे... या प्रकरणी महापालिकेसाठी कचरा उचलणाऱ्या खाजगी कंपनी कनक रिसोर्सेसच्या काही कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवत गौ रक्षकांनी त्यांच्यावर गौ तस्करांसोबत संगनमत करत कत्तल केलेल्या गौ वंशीय प्राण्याच्या अवशेष नष्ट करण्याच्या आरोप केला आहे.

बाईट -- पराग पोटे- पोलीस निरीक्षक जरीपटका ,नागपूर
बाईट -- राजेश शुक्ला (आंतरराष्ट्रीय विश्व हिंदूं परिषद)


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details