महाराष्ट्र

maharashtra

Ashish Deshmukh on Lathicharge: जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप, म्हणाले..

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 9:32 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रालयावर खोटे व बदनामीकारक आरोप केलेत, असा गौप्यस्फोट भाजपा नेते आशिष देशमुख यांनी केलाय. ते आज नागपूर येथे बोलत होते. एवढंच नाही तर अनिल देशमुख यांची या प्रकरणात नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केलीय.

Ashish Deshmukh on Lathicharge
डॉ.आशिष देशमुख

नागपूरAshish Deshmukh on Lathicharge :जालना पोलिसांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटलेत. राज्य सरकारच्या विरोधात राजकीय हेतूने प्रेरित रास्ता रोको, निषेध मोर्चे, बंद अशी आंदोलनं सुरू आहेत. गृहमंत्रालयानं आदेश दिल्यामुळेच लाठीचार्ज करण्यात आला, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर केलाय. भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आणि भाजपा सहमुख्य प्रवक्ते डॉ. आशिष देशमुख यांनी नागपूर येथे आज या विषयावर एका पत्रकार परिषदेत त्यांची प्रतिक्रिया दिलीय.



गृह मंत्रालयाने आदेश दिल्यामुळेच लाठीचार्ज :जालना येथ मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता सुरु असलेल्या उपोषणावर लाठीचार्ज झाला. राज्याच्या गृह मंत्रालयाने आदेश दिल्यामुळेच लाठीचार्ज करण्यात आला, असा खोटा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. हा आरोप शरद पवार यांच्या सांगण्यावरून केला, अशी माहिती मला मिळाली असल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केली आहे. (Maratha Protesters Jalna)


शरद पवारांच्या सांगण्यावरूनच :अनिल देशमुख यांच्याशी माझे जवळचे नातेसंबंध आहे. नागपूरला आम्ही लागूनच राहतो. तिकडे फोन जरी वाजला, तरी त्याचा आवाज आम्हाला ऐकू येतो. शरद पवार यांनी त्यांना सांगितले की, या प्रकारचा आरोप तुम्ही गृह मंत्रालयावर करा. सोबतच शरद पवार यांनी काठेवाडी, बारामती तालुक्यातील त्यांच्या गावात एका अनोळखी व्यक्तीला अजितदादा पवार सरकारमधून बाहेर पडावेत, म्हणून वक्तव्य करण्यास सांगितलंय, असंही आशिष देशमुख म्हटलेय.


मराठा आरक्षणाच्या आडून पवारांचे राजकारण :अजित पवार हे बहुतांश आमदार घेऊन भाजप सरकारमध्ये सामील झालेत, त्यामुळे शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जीर्ण झालाय. स्वत:च्या पायाखालची जमीनच सरकली आहे, हे बघून ते मराठा आरक्षणाचा आडोसा घेऊन राजकारण करत आहेत. त्यासंदर्भात अनिल देशमुख गृह मंत्रालयावर खोटे आरोप करतांना दिसत आहेत. त्यामुऴे त्यांनी मागणी केलीय की, अनिल देशमुख यांनी तात्काळ मराठा समाजाची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. खोटे-नाटे आरोप करण्यापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवावं. मराठा आरक्षणाच्या आडोशाला जाऊन अजित पवारांना अडचणीत आणायचं आणि त्यांना सरकारमधून बाहेर पडण्यास भाग पाडून स्वत:च्या पक्षात सामील करून घेण्याचा घाट शरद पवारांचा आहे, अशी खात्रीपूर्वक माहिती असल्याचा दावा त्यांनी आशिष देशमुख यांनी केलाय. (Ashish Deshmukh on Lathicharge)


अनिल देशमुखांची नार्को चाचणी करा :अनिल देशमुख गृहमंत्री असतांना त्यांना गुह मंत्रालयात त्यावेळी काय चालायचं, हे माहित असणं स्वाभाविक होतं. परंतु, त्यांना आता तिथं काय सुरुय, हे कसं कळणार? गृहमंत्री असतांना त्यांना मनसुख हिरेन यांची हत्या झाली, हे कळलंच नव्हतं. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सचिन वाझे यांनी स्फोटके ठेवली होती, हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं. सचिन वाझे मुंबईतील बार मालकांकडून वसुली करत आहे, याची त्यांना माहिती होती की नव्हती, हे सर्व प्रश्न होते. गृहमंत्री असतांना त्यांचे अधिकारीच त्यांना गंभीरतेनं घेत नव्हते. आता माजी गृहमंत्री असतांना त्यांना खरंच माहिती मिळत आहे का, हा प्रश्न आहे. त्यांना कुठलीही माहिती मिळालेली नाही, ते चुकीचे आणि खोटे आरोप करत आहेत. शरद पवार यांच्या सांगण्यावरून ते हे करत आहेत, ही माझी खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे श्री. अनिल देशमुख यांची नोर्को टेस्ट करा. कट-कारस्थान होत आहे, ते नक्कीच शरद पवार यांच्याकडून होत आहे, असे म्हटल्यास वावगं होणार नाही, असं देखील आशिष देशमुख म्हणाले आहेत. (Ashish Deshmukh allegation on Anil Deshmukh)

हेही वाचा :

  1. Maratha Reservation Protest : सत्तेवर असताना मराठ्यांना शरद पवार का न्याय देऊ शकले नाहीत?
  2. Sharad Pawar On Maratha Reservation : आंदोलकांवर बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, पवारांचं सरकारवर टीकास्त्र
  3. Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून शरद पवारांची सरकारवर टीका, मुख्यमंत्री म्हणाले..

ABOUT THE AUTHOR

...view details