महाराष्ट्र

maharashtra

International Yoga Day : नऊवारी साडी नेसून भाजपच्या महिलांची गेट वे ऑफ इंडिया येथे योगाची प्रत्याक्षिके

By

Published : Jun 21, 2023, 4:22 PM IST

बुधवारी भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे नऊवारी परिधान केलेल्या 90 महिलांनी अभिनवपणे योगा केला. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा व या कार्यक्रमाच्या प्रादेशिक समन्वयक चित्रा वाघ म्हणाल्या की, भारत समृद्ध ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा, नऊवारी परिधान करून यावेळी योग योगासने सादर केली.

International Yoga Day
International Yoga Day

मुंबई :भाजपा महिला मोर्चातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनी गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी ९० महिलांनी नऊवारी नेसून अभिनव पद्धतीने योगासने सादर केली. भारताचा समृद्ध ठेवा, योगसाधनेचे महत्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्राचा पारंपरिक पेहराव नऊवारी नेसून याप्रसंगी ९ पॉवर योगासने सादर केली, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तसेच कार्यक्रमाच्या प्रदेश संयोजक चित्रा वाघ यांनी दिली.



योगसाधनेला जगभरात पोहोचवले :याप्रसंगी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, धकाधकीच्या जीवनात निरोगी, तणावमुक्त रहाण्यासाठी योगसाधना गरजेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा समृद्ध ठेवा असलेल्या योगसाधनेला जगभरात पोहोचवले. त्यांच्या संकल्पनेतून जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाअंतर्गत यंदा २१ जून रोजी योगदिनानिमित्त सर्व विधानसभा, लोकसभा मतदारसंघांमध्ये या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले. योग रील स्पर्धा यासह विविध कार्यक्रमांमध्ये राज्यभरातील भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

योग महिलांसाठी महत्त्वाचा घटक :विशेष म्हणजे सर्व महिलांनी नऊवारी साडी नेसून योगा केल्याने गेट ऑफ इंडियाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. नऊवारीसाडी घालून केलेली योग प्रात्यक्षिके पाहून पर्यटकांनीही आनंद व्यक्त केला. आजच्या धकाधकीच्या, वेगवान युगात योगासने अत्यंत महत्त्वाची आहेत, मात्र जास्तीत जास्त महिलांनी योगा शिकल्यास त्याचा घरासाठीच नव्हे तर, समाजालाही मोठा फायदा होईल, असे येथील पर्यटकांनी सांगितले. तसेच तणावमुक्त राहण्यासाठी प्रत्येकाने रोज ठराविक वेळ देण्याची गरज असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

रंगीबेरंगी साडी परिधान करीत योगासने :भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे नऊवारी साडी परिधान केलेल्या 90 महिलांनी योगासने केली. यात तरुणीपांसून तर वृद्धापर्यंत महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी महिलांनी रंगीबेरंगी साडी परिधान करीत योगासने केली. त्यामुळे पर्यटकांना देखील योगासन कार्यक्रमांचा लाभ घेता आला.

हेही वाचा -International Yoga Day 2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केला मुंबईत योगा दिवस साजरा, पियूष गोयल यांच्यासह राज्यपालांनी घेतला सहभाग

ABOUT THE AUTHOR

...view details