महाराष्ट्र

maharashtra

Abdul Sattar Controversy :सत्तार यांचे वक्तव्य! राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या महीला नेत्या घेणार राज्यपालांची भेट

By

Published : Nov 9, 2022, 2:43 PM IST

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेला आक्षेपार्य वक्तव्याचा राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध नोंदवला जात आहे. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी असे संबोधल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्हीही मंत्रांच्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे

Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई:कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेला आक्षेपार्य वक्तव्याचा राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध नोंदवला जात आहे. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी असे संबोधल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्हीही मंत्रांच्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे. आता या दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षपार्ह वक्तव्याबाबत, दोन्ही पक्षाच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करणार आहेत.

दोन्ही पक्षाकडून नाराजी:आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavhan), निर्मला सावंत (Nirmala Sawant) आणि शिंदे गटाकडून मनीषा कांयदे (Manisha Kayande) या नेत्या राज्यपालांची भेट घेऊन दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी याबाबतचे निवेदन राज्यपालांना देणार आहे. सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde group) नेत्यांकडून सातत्याने महिलांचा अपमान करणारी वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता कृषिमंत्र्यांनी तर थेट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हेतू पुरस्कर शिव्या दिल्या असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून सांगण्यात येत आहे. तर गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) या ठाकरे गटाच्या नटी आहेत असे म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या विरोधात दोन्ही पक्षाकडून नाराजी व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details