महाराष्ट्र

maharashtra

Kirit Somaiya : किरीट सोमैयांच्या तक्रारीला वायकरांनी उच्च न्यायालयात दिले आव्हान, याचिका न्यायालयाने केली दाखल

By

Published : Jun 20, 2023, 7:09 PM IST

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्ट्स क्लबद्वारे 2 लाख स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचे मोठे मैदान हडप केले असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे महापालिकाने रवींद्र वायकर यांच्या पंचतारांकित हॉटेलला रद्द करणारा आदेश जारी केला होता. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात रवींद्र वायकर यांनी दाखल केली आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमैया

मुंबई :मार्च 2023 मध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमैया यांनी आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक मार्गावरील दोन लाख स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचे मैदान बेकायदेशीररित्या हडप केले असल्याची तक्रार केली होती. ही तक्रार मुंबईच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. हे सार्व आरोप निराधार असल्याचे, रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्या तक्रारीच्या आधारे पंचतारांकित हॉटेलची दिलेली अनुमती रद्द करत असल्याचा आदेश जारी केला. त्या विरोधात आमदार रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर आव्हान दिले आहे.



लहान मुलांसाठी मैदान राखीव :मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले हे मैदान होते. हे मैदान लहान मुलांच्यासाठी खेळण्यासाठी म्हणून ते महापालिकेने आरक्षित केले होते. परंतु लहान मुलांसाठी मैदान हे रवींद्र वायकर यांनी बेकायदेशीररित्या हडप केले. तक्रारीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेवर असताना हा कारभार झाल्याचे म्हटले आहे. मुलांसाठी असलेले महापालिकेचे राखीव मैदान है दुसऱ्याच कामासाठी वापरले असल्याची ही तक्रार आहे. मात्र या सर्व तक्रारी अमान्य करत वायकर यांनी हे आव्हान उच्च न्यायालयात दिले आहे.



फाईव्ह स्टार हॉटेल तयार केले : 2009 मध्ये मुंबईतील ही जागा कमाल अमरोली स्टुडिओकडून अविनाश भोसले व शाहिद बलवा यांनी विकत घेतली. आमदार रवींद्र वायकर यांच्यासोबत यामधील एक जागा ही स्पोर्ट्स क्लबसाठी विकसित करण्याचा त्यावेळेला निर्णय झाला. येथे स्पोर्ट्स क्लब बनवण्याच्या नावाखाली फाईव्ह स्टार हॉटेल तयार केले असल्याचे किरीट सोमैया यांनी आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महापालिकेने वायकर यांच्या हॉटेलची परवानगी रद्द करीत असल्याचा आदेश जारी केला. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती शुक्रे यांच्या खंडपीठाकडे
या आठवड्यात सुनावणीस येणार आहे.




हेही वाचा -

  1. Sai Resort Case साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधातली याचिका मागे किरीट सोमय्या यांचा निर्णय
  2. Sanjay Raut Defamation Claim संजय राऊत यांचा किरीट सोमय्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा जाणून घ्या कारण

ABOUT THE AUTHOR

...view details