मुंबई :अनेक कलाकार अभिनयक्षेत्रात नाव कमावल्यावर पुढची पायरी चढताना दिसतात. अनेक जण दिग्दर्शनाकडे वळतात, तर काही निर्मितीकडे. चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित (trailer of Athang produced by Tejaswini Pandit) आता निर्मितीक्षेत्रात उतरली असून; तिची पहिली प्रस्तुती आहे ‘अथांग’. ही एक वेब सिरीज असून; त्यात थरार ठासून भरलेला आहे. 'त्या' वाड्यातील रहस्य आता उलगडणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'अथांग'चा दिमाखदार ट्रेलर लाँच (launched by Raj Thackeray) सोहळा संपन्न झाला. Athang Trailer Launched
भयावह वाडा, वाड्याबाहेर तुळशी वृंदावन, झाडाला लटकवलेल्या काळ्या बाहुल्या, आजुबाजुचे रहस्यमय वातावरण आणि एक अळवत. वेब सिरीज च्या सेटवरील वातावरणनिर्मिती यावेळी करण्यात आली होती. हा थरारक देखावा उभारण्यात आला होता, ‘अथांग’च्या भव्यदिव्य ट्रेलर लाँचसाठी. जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला त्यातील सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला. तसेच या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, दिग्दर्शक अभिजीत पानसे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, श्रेया बुगडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी निर्माती तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्यासोबत गप्पांची मैफलही रंगवली. यानिमित्ताने राज ठाकरे यांचे कलाप्रेमही उपस्थितींना जाणून घेता आले.
या वेळी राज ठाकरे आपल्या कलाप्रेमाबद्दल म्हणाले की, 'मी राजकारणात अपघातानेच आलो. माझा खरा कल कला क्षेत्राकडेच होता. मुळात मी चित्रपटप्रेमी आहे. त्यामुळे मी वेबसीरिज फार कमीच बघतो. परंतु 'अथांग' मी नक्कीच बघणार. जुना काळ पडद्यावर दाखवणे, तसे आव्हानात्मक आहे. मात्र हे आव्हान तुम्ही स्वीकारून उत्तम कलाकृती सादर केली आहे.'