महाराष्ट्र

maharashtra

Tejaswini Pandit : 'टोल'वर पोस्ट केल्यानं अभिनेत्री तेजस्विनी पंडित टार्गेट; ट्विटर ब्लू टिक गायब

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 4:35 PM IST

Updated : Oct 10, 2023, 4:52 PM IST

Tejaswini Pandit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर टोल मुद्द्यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक (MNS Toll Plaza Protest) झाले आहेत. या विषयात अभिनेत्री तेजस्विनी पंडितनंही उडी घेतली होती. इतके वर्ष आम्ही भरलेल्या टोलचे पैसे गेले कुणाच्या खिशात? असा प्रश्न तिनं सत्ताधाऱ्यांना विचारला होता. त्यानंतर टार्गेट केलं जात असल्याचा आरोप तिनं केलाय.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : Tejaswini Pandit : लहान चारचाकी गाड्यांना टोलमाफी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली (MNS Toll Plaza Protest) होती. तसा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं आता मनसे आक्रमक झाली आहे. या आंदोलनात अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं उडी घेत, काही प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर टार्गेट केलं जात असल्याचा आरोप तेजस्विनीनं (Tejaswini Pandit Twitter Post) केलाय.

ट्विटरचं ब्लू टिक काढलं : राजकीय दबाव टाकून तेजस्विनी पंडितच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढण्यात आलंय. आता यासंदर्भात ट्विट करत अभिनेत्री तेजस्विनीनं तिचं मत मांडलंय. तेजस्विनीनं लिहिलं आहे, कोंबडं झाकल्यानं सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्यानं राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक 'आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली' असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?.

आक्रोश कमी होणार नाही : तेजस्विनीनं पुढे लिहिलं आहे की , X (ट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीनं माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणं हाच यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा 'जय हिंद जय महाराष्ट्र'साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!.

काय आहे नेमकं प्रकरण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये जे काही टोलनाके येतात त्या टोलनाक्यांवर चारचाकी वाहनांना मोफत प्रवेश' असल्याचं म्हटलं होतं. त्या व्हिडिओसह अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं ट्विट केलं होतं. त्यात ती म्हणते, म्हणजे? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून! दरम्यान, या पोस्टनंतर तेजस्विनीचं ट्विटर ब्लू टिक काढून टाकण्यात आलंय. तसेच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप तिनं केलाय.

हेही वाचा -

  1. Actress Tejaswini Pandit Tweet: 'राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा'; अभिनेत्री तेजस्विनी पंडितची टोल आंदोलनात उडी
  2. Raj Thackeray on Toll Plaza : राज ठाकरेंचे पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, टोल नाक्यांवरून राज्य सरकारला दिला 'हा' इशारा
  3. Raj Thackeray on Toll Rate : 'लोकांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना परवडणारा नाहीये', टोल दरवाढीवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल
Last Updated : Oct 10, 2023, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details