महाराष्ट्र

maharashtra

Teacher Honour Award: पदवीधर मतदार संघ निवडणुकीमुळे शिक्षकांचे सन्मान पुरस्कार लांबले; लाखो शिक्षकांमध्ये याविषयी चिंता

By

Published : Feb 13, 2023, 9:19 AM IST

Updated : Feb 13, 2023, 9:45 AM IST

पदवीधर मतदार संघ निवडणुकीमुळे शिक्षकांचे सन्मान पुरस्कार लांबले आहे. लाखो शिक्षकांमध्ये याविषयी चिंता निर्माण झाली आहे. आता निवडणुका झाल्या, आचार संहिता संपली. शासनाने त्वरित सन्मान पुरस्कार जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक वर्तुळातून केली जात आहे. वर्षा अखेरीस 28 डिसेंम्बर रोजी जाहीर झाले होते. सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार 108 शिक्षकांना जाहीर झाले होते.

graduate constituency election
शिक्षकांचे सन्मान पुरस्कार

मुंबई :शिक्षकाकडे समाजातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले जाते. चांगल्या शिक्षकांना त्यांच्या कामांना त्यांच्या गुणांना वाव दिला जातो. त्यांच्या श्रमांचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आपल्याकडे आधीपासूनच आहे. राज्यामध्ये सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराबाबत 29 डिसेंबर 2022 रोजी शासन निर्णय झाला. मात्र पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे राज्यातील शिक्षकांचे पुरस्कार लांबले. महाराष्ट्रामध्ये एकूण शासकीय आणि खाजगी अनुदानित या शाळांमध्ये शिक्षकांची कामगिरी त्यांचे गुण, नेतृत्व पाहून सन्मान करण्यासंदर्भात शासनाने निर्णय केलेला होता. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराचे वाटप हे वेळेत केले गेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरलेली आहे.


सन्मान पुरस्कार रखडले : मागील वर्षी कोरोना महामारीमुळे शिक्षकांचे सन्मान पुरस्कार रखडले होते. या वेळेला शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे शासनाने हे सन्मान पुरस्कार पुढे ढकलले. तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने हे पुरस्कार दिले जाणार होते. मात्र त्याचवेळी राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा शासनाने स्थगित केला. मात्र निवडणूक होऊन आता आठ दिवस देखील झाले तरीही पुरस्कारांचा सन्मान सोहळा अद्यापही लांबलेलाच आहे. त्याच्या कोणत्याही तारखा निश्चित होत नाही.



उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा समावेश : महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात 2022 च्या वर्ष अखेरीस 29 डिसेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये राज्यातील विविध शैक्षणिक शिक्षण संस्था, सरकारी शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करणारे असे 108 शिक्षक त्यांना हे वर्ष 21 आणि 22 साठीचे पुरस्कार जाहीर केले गेले होते. या पुरस्कारामध्ये क्रीडा, कला, विज्ञान असे विषय तसेच प्राथमिक माध्यमिक तसेच आदिवासी क्षेत्रामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळेतील शिक्षकांचा समावेश होता.

पुरस्कार त्वरित देण्याची मागणी :यासंदर्भात शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने विचारणा केली असता, त्यांनी नमूद केले की, या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली गेली. त्यामुळे शासनाने सावित्रीबाई सन्मान पुरस्कार पुढे ढकलले. मात्र आता ही संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. शासनाने या गोष्टी वेळेत करायला हव्या. अन्यथा उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांच्या सर्व कामावर पाणी फिरल्यासारखे होईल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाजामध्ये क्रांतीची मुहूर्तमेढ रुजवली. शिक्षणामध्ये पहिल्यांदा तळागाळातील समाजाला स्थान देण्यासाठी ते झटले. त्यांनी देशाला दिशा दाखवली. त्यांच्या नावाने दिला जाणारा सन्मान पुरस्कार शासनाने त्वरित द्यायला हवा.

हेही वाचा : Wheat Prices: गव्हावर प्रत्येक क्विंटल बोनस द्यावा, भाव कोसळण्याआधी नियोजन करावे- शेतकऱ्यांची मागणी

Last Updated : Feb 13, 2023, 9:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details