महाराष्ट्र

maharashtra

उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यांची ४८ तासात चौकशी अहवाल द्या; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश

By

Published : Dec 14, 2022, 10:53 PM IST

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले ( Uddhav Thackeray bungalows ) कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला. तर या प्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ( Rural Development Minister Girish Mahajan ) यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी ४८ तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही सोमय्या यांनी दिली.

Kirit Somaiya
भाजप नेते किरीट सोमय्या

मुंबई -भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी ठाकरे परिवारावर आरोप केला आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray bungalows ) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर १९ बंगले होते. त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मान्य केले आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये बांधले. २०१४ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतही घेतले असल्याचा आरोप सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी केला आहे.

बंगरे गेले कुठे -त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) यांच्या नावावर झाले. २०२० मध्ये त्यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता करही भरला. रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढंच नाही तर, त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी, त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरला आहे. मात्र, आता हे बंगले गायब आहेत. हे बंगले एका रात्रीत कुणी तोडले? कुणी चोरले? तसेच याबाबतचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला? बंगले तोडण्याची परवानगी घेतली होती काय? या सगळ्याचा तपास होणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची हातसफाई -माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांनी २०१७ मध्ये शपथपत्रात वरळी येथील गोमातानगर मधील पत्ता दिला आहे. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गोमाता जनता एसआरए सह. गृह. संस्था वरळीतील सदनिका, गाळ्यामध्ये बेकायदेशीर घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. एसारएकडून चौकशीनंतर हे गाळे ४८ तासात खाली करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. असा दावा करीत मुंबईतील गरीब झोपडपट्टीवासियांच्या सदनिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी लाटल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

अनिल परब यांच्या विरोधात लढाई सुरू राहील - पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून दापोलीत साई रिसॉर्ट उभारल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी आज झाली. त्याला अनिल परब, सदानंद कदम गैरहजर राहिले. त्यांचा पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढेही जोमाने लढाई सुरू राहणार असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे परिवाराच्या गैरव्यवहारा संदर्भात चौकशी ( Submit inquiry report on Uddhav Thackeray bungalow ) करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details