महाराष्ट्र

maharashtra

Shinde Group Protest Against Sanjay Raut : संजय राऊतांच्या विरोधात शिंदे गटाची निदर्शनं

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 5:30 PM IST

Shinde Group Protest Against Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटानं आज मुलुंडमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं.

Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई Shinde Group Protest Against Sanjay Raut:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटानं आज अनोखी निदर्शनं केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्वस्त्राबाबत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य : एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावर कमळाचं चिन्ह असेल, ते एकदा पहावं लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेची दखल, घेत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड, मुंबई येथे जोरदार आंदोलन केलं. शिवसेना शिंदे गटाचे मुलुंड विभागप्रमुख जगदीश शेट्टी यांनी आज संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त निषेध व्यक्त केला आहे. संजय राऊत असेच बोलत राहिले, तर आणखी तीव्र आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


राऊत यांच्या घरावर मोर्चा काढणार :यावेळी बोलताना जगदीश शेट्टी म्हणाले की, संजय राऊत असेच बेताल वक्तव्य करणार असल्यास आम्ही सहन करणार नाही. यानंतर त्यांच्या घरावर देखील मोर्चा काढला जाईल, आज आम्ही त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करत आहोत, असं त्यांनी यावेळी म्हटलंय.


काय म्हणाले संजय राऊत? :"शिंदे नुकतेच भाजपामध्ये आले आहेत. त्यांची अंडरवेअर बघावी लागेल, त्यावर कमळ असेल. त्याशिवाय ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. शिंदे गुलाम झाले आहेत, गुलामांना मत, स्वाभिमान नसतो. "भाजपाचं ध्येय फूट पाडा आणि राज्य करा, असंच आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut News: भाजपाच्या नावावर अयोध्येचा सातबारा नाही, अमित शाह यांनी माफी मागावी- संजय राऊत
  2. suraj chavan on Ramdas kadam : कदम म्हणतात वाद मिटला, तर अजित पवारांवरील टीकेवरुन सूरज चव्हाणांनी सुनावलं
  3. Sharad Pawar : शरद पवार मराठा की ओबीसी?, पाहा शाळा सोडल्याचा दाखला

ABOUT THE AUTHOR

...view details