महाराष्ट्र

maharashtra

इराण-पाकिस्तानमधील तणावामुळं शेअर बाजारात 'भूकंप'; गुंतवणुकदारांचे काही मिनिटांत बुडाले 1.5 लाख कोटी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 11:11 AM IST

Share Market News : शेअर बाजार खुला होताच निर्देशांक घसरला. बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच निर्देशांक 1000 हून अंकांनी घसरून 72,000 च्या पातळीवर आला. यामुळं गुंतवणुकदारांना सुमारे 1.5 लाख कोटींचा फटका बसलाय.

Share Market News
Share Market News

मुंबई Share Market News : बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात खूपच खराब झाली. बाजाराचे दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी उघडल्याबरोबर कोसळले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 755 अंकांच्या घसरणीसह उघडला. काही मिनिटांत 1000 हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टीचाही निर्देशांक वधारला आहे. निफ्टीही 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडलाय.

  • बाजार उघडताच कोसळला सेन्सेक्स : जागतिक बाजारात घसरणीमुळं बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1371 अंकांच्या घसरणीसह उघडून काही मिनिटांतच 72,200 च्या खाली पोहोचला.

निफ्टीही 395 अंकांच्या घसरणीसह उघडला : सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीचीही सुरुवात खराब झाली. निफ्टीचा निर्देशांक 395 अंकांच्या घसरणीसह उघडला. शेअर बाजारात व्यवहार सुरु होताच, सुमारे 574 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1836 शेअर्संनी घसरणीसह व्यवहार सुरू केला. एचडीएफसी बँकेचे शेअर्स सर्वाधिक घसरले. या बॅंकेचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण : सुरुवातीच्या काळात एचडीएफसी बँक, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, अॅक्सिस बँक आणि बजाज ऑटोच्या शेअर्सनं निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली. तर भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, आयटीसी या कंपन्यांचे शेअर्स वधारताना दिसले. बाजारातील व्यवहारात प्रगती होत असताना, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 5.67 टक्क्यांनी घसरले.

बाजारात घसरण्याचं कारण काय : सध्या इराण आणि पाकिस्तानमधील तणावामुळं भू-राजकीय परिस्थिती बिघडण्याच्या शक्यतेनं शेअर बाजारा फटका बसल्याचं मानलं जातंय. इराणनं पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केलंय. या हल्ल्यानंतर पाकिस्तानलाही धक्का बसला आहे. आपल्या हवाई हद्दीच्या बेकायदेशीर उल्लंघनाचा निषेध करतानाच पाकिस्ताननं इराणला गंभीर परिणाम भोगावे लागण्याचा इशारा पाकिस्ताननं दिलाय.

हेही वाचा :

  1. मुंबई शेअर बाजारासह निफ्टीनं गाठला आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक, जाणून घ्या सविस्तर
  2. BSE Sensex Today: मुंबई शेअर बाजारासह निफ्टीनं गाठला विक्रमी निर्देशांक, शेअर बाजारात तेजीची लाट
  3. Share Market Update : इन्फोसिसच्या शेअरमध्ये सुमारे 12 टक्क्यांचा फटका, शेअर बाजार निर्देशांकांत 677 अंकांची घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details