महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar on Election : जागावाटपाबद्दलच्या 'त्या' विधानाचा चुकीचा अर्थ काढला; शरद पवारांचा दावा

By

Published : Apr 24, 2023, 6:25 PM IST

आगामी निवडणुकांच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. त्याचा योग्यवेळी विचार केला जाईल, असे आपण म्हणालो होतो; मात्र अमरावतीमधील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे ऐक्य टिकून राहावे, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अशा शक्तींचा बिमोड करण्यासाठी ऐक्य टिकलेच पाहिजे हे आपण सातत्याने सांगत आहोत, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

Sharad Pawar Statement Misinterpreted
शरद पवार

मुंबई:राज्यातील महाविकास आघाडीची एकता कायम राहावी, असे माझे प्रयत्न आहेत; मात्र अद्याप कोणत्याही सूत्राच्या आधारे जागावाटप झालेले नाही. आघाडीतील जागावाटप बद्दलचे 'ते' वक्तव्य होते. मी सध्याच्या परिस्थितीविषयी वक्तव्य केले होते. मी केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला असल्याचे शरद पवारांनी सांगितले.


वज्रमूठ सभेला शरद पवार नसणार?मुंबईतील बीकेसी येथे १ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा संपन्न होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सभेला उपस्थित असल्याचे प्रथम बोलले जात होते. त्यामुळे वज्रमूठ सभेला आगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि त्यानंतर राज्यात होणाऱ्या वज्रमूठ सभेला देखील शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


पवारांची नागपूरच्या सभेला उपस्थिती: राज्यात आतापर्यंत महाविकास आघाडीच्या वतीने दोन मोठ्या सभा पार पडल्या. त्याला देखील शरद पवार उपस्थित नव्हते. ते हे मोठे नेते आहे. वज्रमूठ सभा ह्या आमच्या लेव्हलच्या असल्याचे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. तसेच नागपूरच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार नाही, अशा पद्धतीच्या माध्यमातून बातम्या येत होत्या. तरी देखील ते नागपूरच्या सभेला उपस्थित होते.


पवारांच्या विधानाचा अर्थ काढणे कठीण:महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटे घडून आलेला शपथविधी सर्वांत मोठी नाटकीय घडामोड होती. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील या संदर्भात विधान केले होते. ते म्हणाले की, पहाटे झालेल्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली होती. यावर पवारांनी बोलताना 'समझनेवाले को इशारा काफी', असे म्हटले होते. त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काढणे जिकरीचे असते. पवारांच्या विधानाचा अर्थ वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी देखील, असू शकते असे सध्या बोलले जात आहे.

भाजपमुळेच आघाडीत बिघाडी? शरद पवार यांनी 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आताच सांगू शकत नाही असे म्हटले आहे. तसेच त्यांनी अदानी मुद्यावरही कॉंग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत नक्कीच मोठी फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे. यामागे भाजपचा हात असू शकतो अशी शंका देखील व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:YS Sharmila Slaps SI : वायएस शर्मिला यांनी पोलिसाला लावली थप्पड, लेडी कॉन्स्टेबलला मारला धक्का, पोलिसांनी केली अटक

ABOUT THE AUTHOR

...view details