महाराष्ट्र

maharashtra

ST Workers Strike : एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी बोलावली आज बैठक

By

Published : Jan 10, 2022, 9:51 AM IST

मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजून ही काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी ( ST Workers Strike ) आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र आता शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी या संपावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक बोलावली आहे.

Sharad Pawar
शरद पवार

मुंबई : दिवाळी पासून सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप ( ST workers strike ) अद्यापही मिटलेला नाही. एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनामध्ये करण्यात यावं. या मागणीवर ठाम असणारे कित्येक एसटी कर्मचारी अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar called meeting ) यांनी पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार (Meeting at Sahyadri Guest House ) आहे. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) आणि एसटी कृती समितीचे सदस्य उपस्थित राहणारआहेत.

या अगोदर ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन एसटी संपावर तोडगा काढण्याच्या सूचना शरद पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार ( Finance Minister Ajit Pawar ) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना दिल्या होत्या. मात्र पगार वाढ दिल्यानंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

हेही वाचा :Fire At Bhaykhala : भायखळा येथील लाकडाच्या गोदामाला आग

ABOUT THE AUTHOR

...view details