महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेसने अंतर्गत वादळातून सावरावे - संजय राऊत

By

Published : Aug 27, 2020, 2:49 PM IST

देशाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची गरज आहे. संपूर्ण देशभरात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील, ते राहुल गांधीच आहेत. ते पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आता त्यांनी तळागाळात येऊन काम सुरू करायला हवे. पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत, त्यांनीही यात योगदान दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई -काँग्रेसमध्ये अंतर्गत काय घडामोडी झाल्या त्यावर काँग्रेसनेच बोललेले पाहिजे. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. सध्या देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. पक्षांतर्गत वादळातून काँग्रेसने सावरावे व तळागाळात काम सुरू करावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली.

तीन पक्षाचे सरकार असताना आमदार-खासदारांची निधी वाटपाबाबत नाराजी आहे. खासदार संजय जाधव हे मुंबईत आलेले आहेत, यातून लवकरच मार्ग निघेल. केंद्राने निधी गोठवल्याने अडचण होत आहे, असे स्पष्टीकरण राऊत यांनी खासदारांच्या नाराजीवर दिले. तिन्ही पक्षांमध्ये एक समन्वय समिती असावी, असे वाटत होते. मात्र, अशा समितीची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, असेही राऊत यांनी सांगितले.

देशाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची गरज आहे. संपूर्ण देशभरात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील, ते राहुल गांधीच आहेत. ते पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आता त्यांनी तळागाळात येऊन काम सुरू करायला हवे. पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत, त्यांनीही यात योगदान दिले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येवून लढायला हवे हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, अस देखील राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details