महाराष्ट्र

maharashtra

Khelo India 2022 : खेलो इंडियामध्ये संपदा आणि अपूर्वाची निवड; उत्तर प्रदेशात त्या दोघींनी मुंबईचा फडकवला झेंडा!

By

Published : Mar 26, 2022, 2:13 PM IST

ऑल इंडिया आंतर विद्यापीठातर्फे नुकतेच महिला ज्युदो स्पर्धा २०२२ आयोजन उत्तर प्रदेश येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाच्या कानपूर ( Kanpur University ) येथील क्रिडांगणात करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या अपूर्वा पाटील आणि संपदा संजय फाळके - ७८ किलो वजनी गट यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदाकांची कमाई करून उत्तर प्रदेशात मुंबईचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे संपदा आणि अपूर्वाची निवड आता खेलो इंडिया स्पर्धेमध्ये निवड ( Mumbai Girls Selected for Khelo India ) झाल्याचे कानपूर विद्यापीठात घोषित करण्यात आले.

Sampada and Apurva from Mumbai University got selected for Khelo India 2022
खेलो इंडियामध्ये संपदा आणि अपूर्वाची निवड

मुंबई -ऑल इंडिया आंतर विद्यापीठातर्फे नुकतेच महिला ज्युदो स्पर्धा २०२२ आयोजन उत्तर प्रदेश येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाच्या कानपूर ( Kanpur University ) येथील क्रिडांगणात करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या अपूर्वा पाटील आणि संपदा संजय फाळके - ७८ किलो वजनी गट यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदाकांची कमाई करून उत्तर प्रदेशात मुंबईचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे संपदा आणि अपूर्वाची निवड आता खेलो इंडिया स्पर्धेमध्ये निवड ( Mumbai Girls Selected for Khelo India ) झाल्याचे कानपूर विद्यापीठात घोषित करण्यात आले.

५४८ महिला खेळाडूंनी घेतला भाग -ऑल इंडिया आंतर विद्यापीठातर्फे २१ मार्च ते २४ मार्च रोजी उत्तरप्रदेश येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाच्या कानपूर येथील क्रिडांगणात महिला ज्युदो स्पर्धा २०२२ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील एकूण १४४ विद्यापीठाने भाग घेतला होता. सर्वसाधारण ५४८ महिला स्पोर्ट्स विद्यार्थ्यांनींनी आपली उपस्थिती नोंदविली. त्यामध्ये मुंबई विद्यापीठातर्फे ६ विद्यार्थीनींची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रत्येकी वेगवेगळ्या किलो वजनी गटात निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या अपूर्वा पाटील + ७८ किलो वजनी गट सोमय्या कॉलेज आणि कुमारी संपदा संजय फाळके - ७८ किलो वजनी गट यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदाकांची कमाई करून उत्तर प्रदेशात मुंबईचा झेंडा फडकविला आहे. वेगवेगळ्या राज्यातील स्पर्धकांबरोबर ६ फे-या खेळून या दोघींनी पदाकांवरील आपले नाव कोरले.

हेही वाचा -Ipl 2022 Updates: गुजरात टायटन्स संघाने लाँच केले आपले 'आवा दे' एंथम साँग

कानपूर विद्यापीठात घोषणा -

संपदा फाळके ही खालसा कॉलेजची विद्यार्थीनी असून सोबत संघ व्यवस्थापक शिल्पा शेरीगर व प्रशिक्षिका पुजा फातर्फेकर यांची त्यांना छान साथ लाभली. संपदा व अपूर्वा यांचे आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू रविंद्र पाटील यांनी समर्थ व्यायाम मंदीरातर्फे दूरध्वनी वरुन अभिनंदन केले. या दोघींचे खेलो इंडिया स्पर्धेमध्ये निवड झाल्याचे कानपूर विद्यापीठात घोषित करण्यात आल्यानंतर यामुळे मुंबईतील खेळाडुंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details