महाराष्ट्र

maharashtra

Sameer Wankhede: एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जातीवरून केला अपमान- समीर वानखेडे यांची कॅटसह मुंबई पोलिसात तक्रार

By

Published : May 19, 2023, 10:40 AM IST

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांनी गुरुवारी आरोप केला की, एनसीबीचे तत्कालीन उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी वानखेडे हे मागास समाजातील असल्याने चौकशीदरम्यान त्यांचा अपमान केला आणि छळ केला.

Sameer Wankhede
समीर वानखेडे

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग बस्ट प्रकरणात आर्यन खान याला न अडकवल्याबद्दल सुपरस्टार शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांच्या कथित मागणीच्या संदर्भात सीबीआयने वानखेडे यांना गुरुवारी मुंबईत चौकशीसाठी बोलावले होते, परंतु वानखेडे एजन्सीच्या टीमसमोर हजर झाले नाहीत. भारतीय महसूल सेवेच्या अधिकाऱ्याने पीटीआयला फोनवरून सांगितले की, त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

अपमानास्पद भाषा वापरली :क्रूझ ड्रग्ज बस्ट प्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्यासह अन्य चार जणांचे नाव एफआयआरमध्ये नोंदवले आहे. एफआयआर एनसीबीचे तत्कालीन उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालावर आधारित आहे जे विशेष चौकशी पथकाचे (एसईटी) प्रमुख होते. वानखेडे म्हणाले, माझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला, कारण मी सिंह यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. मी मागास समाजातील असल्यामुळे माझ्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल सिंह यांच्याविरुद्ध एफआयआर मागण्यासाठी मी दिल्लीतील एससी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज :सिंह यांनी तयार केलेल्या अहवालाविरोधात त्यांनी कॅटकडेही धाव घेतली होती, असे वानखेडे यांनी सांगितले. त्यांनी ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील गोरेगाव पोलिस स्टेशनला देखील एससी-एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. सिंह यांनी सीबीआयचा वापर करून आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून बाहेर काढण्यास मदत केली, असा आरोप वानखेडे यांनी केला. आर्यनला त्यांच्या सूचनेनुसारच ताब्यात घेतले होते, असे वानखेडे म्हणाले. यावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी संपर्क केला. परंतु त्यांनी कॉल आणि मेसेजला प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा :

  1. Sameer Wankhede Bribery Case : दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना दिलासा; पाच दिवस अटकेपासून संरक्षण
  2. CBI Raid On Sameer Wankhede : 25 कोटी लाचप्रकरण; समीर वानखेडेंच्या घरी दुसऱ्या दिवशीही सीबीआयची छापेमारी
  3. CBI Raid On Sameer Wankhede House : समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ची छापेमारी, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details