मुंबई : बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. क्रिप्टोचलन म्हणजे काय? हे सर्वांना जाणून घ्यायचे असते. त्याबद्दल थोडी माहिती समजून घेऊयात.
व्यवहार गोपनीय :आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी नाही.
रोलर कोस्टर राइड :2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी आणि आज बिटकॉइनची किंमत 14 लाखांच्या आसपास आहे. एवढेच नाही तर ही क्रिप्टोकरन्सी ५० लाख रुपयांच्या आकड्याला स्पर्श करून परतली आहे. आता तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता की रोलर कोस्टर राइड बिटकॉइनने या 14 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना किती दिला आहे.