महाराष्ट्र

maharashtra

Ravi Rana on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या विरोधात रवी राणा दाखल करणार मानहानीची याचिका

By

Published : Dec 6, 2022, 7:45 AM IST

अपक्ष आमदार रवी राणा ( Independent MLA Ravi Rana ) यांनी मुंबई सत्र न्यायालयाची सुनावणी संपल्यानंतर असे वक्तव्य केले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या विरुद्ध मी लवकरच मानहानीच्या दावा दाख (Filed a defamation suit ) करणार आहे.

Ravi Rana on Uddhav Thackeray
ठाकरेंच्या विरोधात राणा दाखल करणार मानहानीची याचिका

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या विरुद्ध मी लवकरच मानहानीच्या दावा दाखल (Filed a defamation suit ) करणार असे वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा ( Independent MLA Ravi Rana ) यांनी मुंबई सत्र न्यायालयाची सुनावणी संपल्यानंतर केले आहे. पुढे रवी राणा म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणतात की त्यांना महिला मुख्यमंत्री करायची आहे आणि त्याचबरोबर ते एका महिलेच्या अपमान करतात हे कितपत योग्य आहे ? असे प्रश्न देखील रवी राणा यांनी उपस्थित केले आहे.


अब्रू नुकसानीच्या दावा करणार : आमदार रवी रणांच्या आरोप आहे की, उद्धव ठाकरे यांनी खोटी केस करून आम्हाला तुरुंगात टाकले. एका महिला खासदारचा अपमान केला, म्हणून आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीच्या दावा करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी एका महिलेला त्रास दिला अपमान केला म्हणून त्यांना सरकार गमवावे लागले आणि आता ते एका महिलेला मुख्यमंत्री करणार असं दावा करत आहेत .


वॉरंट रद्द करण्यासाठी रवी राणा कोर्टात हजर :हनुमान चालीसा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयामध्ये मागील 2 सुनावणी दरम्यान हजर न राहिल्या कारणाने राणा दांपत्य यांच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट मुंबई सत्र न्यायालयाने जारी केला होता. मात्र तो वॉरंट रद्द करण्यासाठी रवी राणा कोर्टात हजर झाले होते. मात्र न्यायालयाने या प्रकरणावर दुपारी सुनावणी ठेवली होती. दुपारी आमदार रवी राणा पुन्हा कोर्टात हजर झाले पण न्यायालयाने त्यांना प्रश्न विचारला की 5000 रुपयांचा बॉण्ड पोलीस ठाण्यात सादर करून वॉरंट का नाही रद्द केले ? म्हणून 14 डिसेंबर म्हणजे पुढच्या तारीखला दोघांनीही कोर्टात हजर व्हा असे निर्देश कोर्टामार्फत देण्यात आला. मात्र 14 डिसेंबर ऐवजी 17 डिसेंबरला हजर राहण्याची परवानगी द्या असी विनंती रवी राणा यांच्याकडून कोर्टात करण्यात आली. रवी राणा यांच्या जामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा अर्जावर कोर्टाने काहीच निकाल दिला नाही म्हणून रवी आणि नवनीत राणा या दोघांनाही सत्र न्यायालयात 17 डिसेंबर रोजी उपस्थित राहून अर्ज करावा लागणार आहे.


कोर्टाचा आम्हाला आदर आहे : यासंदर्भात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की कोर्टाचा आम्हाला आदर आहे आणि त्या अनुषंगाने 17 डिसेंबरला नवनीत राणा आणि मी, आम्ही दोघेही कोर्टात हजर राहणार आहोत. नवनीत राणा अमरावती मध्ये महत्त्वाची काम होते म्हणून त्या हजर राहिल्या नाहीत. मात्र पुढील तारखेला आम्ही दोघेही कोर्टात हजर राहू कोर्टाला सहकार्य करू आणि कोर्ट जे काही निर्देश आम्हाला देईल त्याचा पालन आम्ही करणार आहोत.


ABOUT THE AUTHOR

...view details