महाराष्ट्र

maharashtra

Corona Update Mumbai : मुंबईत चौथ्या लाटेचा धोका, मास्क वापरा सामूहिक चाचण्या करण्याच्या सुचना

By

Published : Jun 3, 2022, 8:07 PM IST

मुंबईत गेल्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तज्ज्ञांनी कोरोनाची चौथ्या लाटेचा धोका आहे (Possibility of 4th wave in Mumbai) असा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता चाचण्यांची संख्या तातडीने वाढवा सामूहिक चाचण्या घ्या (conducting mass tests) तसेच मास्कचा वापरा (use of mask) असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. त्या संबंधिच्या सूचना टास्क फोर्सकडून करण्यात आल्या आहेत.

मुंबई कोरोना अपडेट
Corona Update Mumbai

मुंबई: महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत गेल्या आठवडाभरात वेगाने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी शुक्रवारी प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता (Possibility of 4th wave in Mumbai) वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, असे आयुक्त डॉ. चहल यांनी म्हटले आहे. कोविड आणि मॉन्सून या दोन्हीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पुढील एक दोन आठवडे कोविड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. कोविड विषाणूचे नवीन उप प्रकार आढळले तरी त्यांच्या तीव्रतेबद्दल अद्याप भाष्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रारंभापासून आजही नियमितपणे मास्कचा उपयोग करतात. त्याचे पालन नागरिकांनी देखील करणे आवश्यक आहे. अशी सूचना राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी केली.



काय आहेत सूचना :मुंबईत कोविड चाचण्यांची प्रतिदिन संख्या ८ हजार आहे, ती प्रतिदिन ३० ते ४० हजार पर्यंत वाढवणे आवश्यक
- सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी
- जिथे कोविड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी.
- इमारती, गृहनिर्माण संस्थांमध्ये बाधित रुग्ण आढळतील, त्या इमारती, गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्व रहिवाशांची सामूहिक कोविड चाचणी करावी.

- सर्व विभाग नियंत्रण कक्षांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रणा, साधनसामग्री उपलब्ध आहे का याचा आढावा घ्यावा आणि नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवावे.
- मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सर्व रुग्णालयांनी गरजेइतका औषधसाठा खरेदी करुन उपलब्ध करुन घ्यावा.
- सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी.
- १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे वेगाने लसीकरण करावे.

हेही वाचा : Corona In Mumbai : मुंबईत कोरोना वाढतोय; चाचण्या वाढवा, पालिका आयुक्तांचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details