महाराष्ट्र

maharashtra

political Reaction on Governor resignation : राजीनामा मंजूर झाल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्यावर विरोधकांकडून चौफेर टीका

By

Published : Feb 12, 2023, 12:37 PM IST

Updated : Feb 12, 2023, 1:09 PM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदावरून मुक्त झाले आहेत. माननीय पंतप्रधानांच्या मुंबई भेटीदरम्यान, त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याबाबतचे ट्विट देखील त्यांनी केले होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

political Reaction on Governor resignation
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुूळातून प्रतिक्रिया

सुषमा अंधारे

मुंबई : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण असे विचारेल होते. हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. जसे चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण तसेच समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल होते. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंग कोशारीजी, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती असेही त्यांनी म्हटले.


आदित्य ठाकरे यांचे ट्विट :महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाही आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्याला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही! असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

अमोल मिटकरी यांचे ट्विट : उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली.. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

जयंत पाटील यांचे ट्विट

जयंत पाटील यांचे ट्विट :राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी स्वीकारला. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, त्यामुळेच राष्ट्रपतींनी राज्यपालांना पायउतार करण्याचा घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस हे भारतीय जनता पक्षाच्या हातातले बाहुले बनणार नाहीत अशी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.



राज्यपाल रमेश बैस यांचे स्वागत :राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे ट्विट करून स्वागत केले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा ही दिल्या. दहा वर्षांच रमेश बैस यांच्यासोबत संसदीय कार्याचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाला ते नक्कीच न्याय देतील, अशी आशाही सुप्रिया सुळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी आनंद उत्सव साजरा करणार :राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी स्वीकारला. राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आनंद उत्सव साजरा करणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांनी ही माहिती दिली आहे. राज्यपालांनी महापुरुषाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती राज्यभरात राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून निदर्शना करण्यात आली होती. राज्यपालांना वादग्रस्त वक्तव्यामुळे पदमुक्त करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात येत होती आणि त्यानंतर राष्ट्रपतीचा राजीनामा मंजूर झाल्याने राज्यभरात आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे.

अमोल कोल्हे : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी माननीय रमेश बैस यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने फायदा व्हावा, हीच अपेक्षा! असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले आहे.महामहिम श्री.रमेश बैस जी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली.त्यांचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने स्वागत. त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा उत्तमरित्या घडो याच सदिच्छा.! असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.



हेही वाचा :Transfers Of Governors : 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले, वाचा संपूर्ण यादी

Last Updated : Feb 12, 2023, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details