महाराष्ट्र

maharashtra

Chhota Rajan : छोटा राजनची नुकसान भरपाईची याचिका, मागितला केवळ एक रुपया

By

Published : Jun 2, 2023, 1:28 PM IST

केवळ एक रुपया नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत छोटा राजन याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेडी खून खटल्या संदर्भातील कथित वेब सिरीज रोखण्यासाठी कुख्यात आरोपी छोटा राजन वतीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. छोटा राजनने नुकसान भरपाई म्हणून केवळ एक रुपया मागितला आहे.

छोटा राजन
छोटा राजन

मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी विश्वाच्या बातम्यांचा वार्तांकन करणारे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या खून खटल्या संदर्भात वेब सिरीज सुरू असल्यामुळे त्यातील ट्रेलर आणि ती बेव मालिका रोखण्यासाठी राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याने या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठांमध्ये ही याचिका केली आहे. पुढील काही दिवसात लवकर त्याची सुनावणी होईल.



कुख्यात आरोपी असलेला छोटा राजन हा गँगस्टर टोळीचे नेतृत्व करतो. म्हणून अनेक गुन्हे त्याच्या नावावर नोंद आहेत. परंतु त्याने एक महत्त्वाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. त्याने त्यात मागणी केलेली आहे की, त्याच्या वैयक्तिक खासगी आयुष्याच्या बाबी सार्वजनिक केल्या जात आहेत. त्याच्यावर अतिक्रमण या वेब सिरीज मधून होते. 2011 मध्ये गुन्हेगारी विश्वाचे वार्तांकन करणारे पत्रकार ज्योतिर्मय डे यांचा खून झाला होता. तो पवई येथे त्यांच्या घराजवळ झाला होता. त्या संदर्भातच दुसऱ्या एका पत्रकार जिग्ना व्होरा त्यांच्यावर त्याबाबत आरोप होता. परंतु त्या निर्दोष सुटल्या होत्या. त्यांनी काही आठवणी लिहिलेल्या आहेत. त्या आठवणींवर आधारित वेब सिरीज सुरू होणार होती. त्याचा ट्रेलर पाहून छोटा राजन याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात त्याला स्थगिती मिळवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. आपली बदनामी झाली म्हणून केवळ एक रुपया नुकसान भरपाई मिळावी असे देखील याचिकेमध्ये अधोरेखित करण्यात आलेले आहे.

नेटफ्लिक्स या जगप्रसिद्ध वेब सिरीज चालवणाऱ्या माध्यमावर हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेली महत्त्वाची वेब सिरीज सुरू होणार आहे. त्याबाबतचा ट्रेलर देखील नेटफ्लिक्सवर दाखवण्यात आला होता. त्यामध्ये ज्या पद्धतीने कथा दाखवलेली आहे. त्यात छोटा राजन याच्या वैयक्तिक अधिकारावर अतिक्रमण होते बदनामी केली जाते आहे. - छोटा राजन


वेब सिरीजवरील त्या मालिकेचे निर्माते हंसल मेहता यांनी ही मालिका प्रदर्शित करू नये. त्यासाठी म्हणून आधी प्रयत्न केला होता. पण त्यांनी ऐकले नाही. म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आलेले की, एका खोट्या कथानकावर आधारित ही वेब सिरीज तयार करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details