महाराष्ट्र

maharashtra

अश्लील चित्रफीत प्रकरणी अटकेनंतर कुंद्राच्या 'या' व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा

By

Published : Jul 20, 2021, 2:03 PM IST

Updated : Jul 20, 2021, 2:13 PM IST

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशीरा अटक केली आहे. राज कुंद्रावर अश्लील सिनेमे बनवून अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अनेक जण त्याच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पाहत असून त्याखाली कमेंट करत आहेत.

छायाचित्र
छायाचित्र

हैदराबाद - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) रात्री उशीरा अटक केली आहे. राज कुंद्रावर अश्लील सिनेमे बनवून अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अनेकजण त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरील व्हिडिओ पाहत आहेत. राज आपल्या इंस्टावरुन अनेक व्हिडिओ शेअर करत होता. त्या व्हिडिओला अनेक जण कमेंट करत आहेत.

हेही वाचा -शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक; पोर्नोग्राफी प्रकरणात सहभागाचा संशय

राज कुंद्रा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव असतो. सुमारे 1 मिलीयन त्याची फॅन फॉलोविंग आहे. तो सतत आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओ व फोटो शेअर करतो. सोमवारीच म्हणजेच अटकेच्या दिवशी त्याने एक व्हिडिओ त्याच्या इंस्टावर टाकला होता.

हेही वाचा -...तर राज कुंद्राला होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा, 'असा' आहे कायदा

Last Updated :Jul 20, 2021, 2:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details