महाराष्ट्र

maharashtra

Old Woman Died Elevator Accident : लिफ्टमध्ये अडकून 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू; दोन महिन्यातील तिसरी दुर्घटना

By

Published : Oct 30, 2022, 5:33 PM IST

गोराई चारकोपमधून (Gorai Charkop Mumbai Elevator Accident) एक धक्कादायक व लक्ष विचलित करणारी बातमी समोर आली आहे. रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकून एक 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू (old woman died after getting stuck in elevator) झाला आहे. नगीना अशोक मिश्रा असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गोराई चारकोप मधील हायलँड ब्रिज इमारतीत घडली आहे. (Mumbai Crime), (Mumbai latest news)

Old Woman Died Elevator Accident
लिफ्टमध्ये अडकून महिलेला मृत्यू

मुंबई :गोराई चारकोपमधून (Gorai Charkop Mumbai Elevator Accident) एक धक्कादायक व लक्ष विचलित करणारी बातमी समोर आली आहे. रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकून एक 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू (old woman died after getting stuck in elevator) झाला आहे. नगीना अशोक मिश्रा असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गोराई चारकोप मधील हायलँड ब्रिज इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे लिफ्ट मुळे होणाऱ्या अपघातांचा (Elevator Accident Mumbai) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Mumbai Crime), (Mumbai latest news)

लिफ्ट अपघाताविषयी माहिती देताना मृत महिलेचा मुलगा
लिफ्टचे दार उघडताना विजेचा शॉक-चारकोप परिसरातील हायलँड ब्रिज या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणाऱी 62 वर्षीय महिला 21 ऑक्टोबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी लिफ्टने खाली उतरत होती. इमारतीची लिफ्ट अचानक तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मध्यभागी अडकली. यामुळे घाबरून महिलेने आपल्या मुलाला आवाज दिला असता मुलगा पळत पळत आला व त्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला विजेचा शॉक लागल्यामुळे त्याने त्वरित पळत जाऊन विद्युत पुरवठा बंद केला. लिफ्ट तळमजल्यावर आदळली- इमारतीच्या गेटवरील सिक्युरिटी गार्डला सोबत घेऊन लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता लिफ्ट अति वेगाने तळमजल्यावर जाऊन आदळली. लिफ्ट आढळल्यामुळे तळ भागाला दोन मोठे होल पडले. या दुर्घटनेत त्या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली. यानंतर जखमी अवस्थेत महिलेला सोसायटीतील रहिवाशांनी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले.

यापूर्वीही घडले लिफ्टमुळे अपघात - मागील दोन महिन्यातील लिफ्टच्या अपघातामुळे मृत्यू मृत्यू होऊन तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. मालाड चिंचोली बंदर परिसरात 17 सप्टेंबर रोजी एका 26 वर्षीय शिक्षिकेला लिफ्टच्या अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. अशाच प्रकारची घटना यानंतर कांदिवली परिसरात देखील घडली होती यात 70 वर्षीय नागरिकाला आपला जीव गमवावा लागला.आणि आता 21 ऑक्टोबर रोजी नागिना मिश्रा या महिलेला लिफ्ट अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details