महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

By

Published : Nov 3, 2020, 3:00 PM IST

अंधेरी तहसीलदार कार्यालयाबाहेर मंगळवारी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये, यासह अनेक प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

andheri obc andolan
मुंबईत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पेटलेला असताना आता ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू झाले आहे. अंधेरी तहसीलदार कार्यालयासमोर आज (मंगळवार) ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजन्नोती संघ मुंबईचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
मराठ्यांची ओबीसीकरण करू नये, ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये, महाज्योती संस्थेस १००० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी, सारथी संस्थेप्रमाणेच महाज्योती संस्थेलाही स्वायत्तता देण्यात यावी, मागासवर्गीयांची तातडीनेअनुशेष भरती करण्यात यावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे महात्मा फुले आर्थिक महामंडळ (ओबीसी आर्थिक महामंडळ) तसेच वसंतराव नाईक आर्थिक महामंडळ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details