महाराष्ट्र

maharashtra

IIT Students In Non Core Jobs: आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा नॉन कोअर नोकऱ्यांकडे वाढतोय कल; जाणून घ्या कारण

By

Published : Feb 26, 2023, 5:31 PM IST

उच्च शिक्षणामध्ये नॉन कोर आणि कोअर असे क्षेत्र पाडले गेलेले आहेत. जसे की संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या क्षेत्रामध्ये विशेष करून जास्तीत जास्त वार्षिक पॅकेज देणाऱ्या नोकऱ्या मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल याच जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्यांकडे राहिलेला दिसतो, असे आयआयटीचा शोध अभ्यास करणाऱ्या केंद्राने अभ्यासातून समोर आणले आहे.

IIT Students In Non Core Jobs
नॉन कोअर नोकऱ्यांकडे वाढतोय कल

मुंबई: सेंटर फॉर पॉलिसी स्टडी आयआयटी मुंबई स्थित संशोधन करणारे केंद्र आहे. या केंद्रात शिशिर झा, अनुराग मेहरा, नमिता अग्रवाल आणि शैललक्ष्मी श्रीनाथ यांनी अभ्यास केला होता. तो अभ्यास 2014 ते 2018 च्या पाच वर्षांच्या नोकऱ्या कोणत्या आणि कशा मिळतात त्याच्या आधारावर होता. त्यातून महत्त्वाची एक बाब समोर आलेली आहे की, नॉन कोअर असलेल्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जास्त नोकऱ्या भावतात. कारण त्यामध्ये अधिकचा पगार दर वर्षाला मिळतो.


'या' क्षेत्रात वेतन जास्त: सेंटर फॉर पॉलिसी स्टडी आयटी मुंबई यांनी जो काही शोधा अभ्यास केला त्यामध्ये साधारणत: सांख्यिकीच्या आधारावर त्यांनी तथ्य मांडले आहे. यानुसार कार्यप्रदर्शन निर्देशांक हा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये अधिक दिसत आहे. त्या क्षेत्रामध्येच अधिक पगार मिळतो. त्यामुळे त्या क्षेत्रांकडे विद्यार्थी जातात असे अभ्यासातून आढळले आहे. विशेष करून नॉन कोर हे जे विषय किंवा अनेक क्षेत्र आहे त्यामध्ये पगाराच्या बाबतीत उच्च कार्य निर्देशांक नोंदवला गेला. सुमारे आठ ते दहा अशा प्रकारचा उच्च कार्यनिर्देशांक या बाबतीत विद्यार्थ्यांचा आढळला. यामध्ये संगणक विज्ञान इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी यामध्ये प्रचंड प्रमाणात वार्षिक पगार मिळतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा ज्यामध्ये अधिक पगार दिला जातो. ज्यामध्ये अधिक पगार मिळण्याची शक्यता आहे, अशाच नोकऱ्यांकडे ते वगळत असल्याचे यामधून दिसते.


तर 'हे' आहे मुख्य कारण: नॉन कोरक्षेत्र किंवा विषय याकडे विद्यार्थी वळतात. त्यामुळे कोर विषय किंवा कोरक्षेत्र याकडे विद्यार्थी तुलनेने कमी संख्येने मिळतात. याचे कारण नोकरीतून मिळणारी अधिकची संपत्ती. याच्याशी त्याचा सांधा जुळत असल्याचे सेंटर फॉर पॉलिसी स्टडी मधील अभ्यासकांनी केलेल्या शोध अभ्यासामधून ही बाब समोर आले आहे. यासंदर्भात या संशोधनामध्ये असे देखील नमूद करण्यात आले की, मूलभूत विज्ञानामध्ये जो जगभरामध्ये शोध केला जातो त्या संदर्भात देखील भारतामधील आयआयटीच्या उच्च शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांनी वळायला हवे. तसेच या संदर्भात अनेक संधी आहेत त्यामध्ये वाढ देखील होणार आहे. मूलभूत विज्ञानामधील शोध लागतात त्या आधारावरच इतर शोध पुढे विकसित होतात. केवळ एका क्षेत्रामध्ये अधिक विद्यार्थ्यांचा कल असणे हा केवळ पगाराच्या निमित्ताने कल असतो. मात्र ज्ञान आणि देशाच्या संदर्भातील महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये देखील विद्यार्थ्यांनी वळायला हवे. ज्यामुळे गरज असणाऱ्या जनतेला तंत्रज्ञान अल्प किमतीमध्ये आपल्या हातामध्ये मिळेल, अशा देखील प्रश्नांकडे वळण्याची गरज या शोध अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तसेच मूलभूत विज्ञान म्हणजे कोअर क्षेत्र असे तंत्रज्ञानाच्या परिभाषेमध्ये म्हटले जाते. त्या कोअर विषयाकडे विद्यार्थ्यांनी वळायला हवे. जगभरातील औद्योगिक क्षेत्राने देखील कोअर संदर्भात तसा विचार केल्यास त्या क्षेत्रात देखील अधिकच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील.

हेही वाचा:Breaking News : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details