महाराष्ट्र

maharashtra

Nitin Gadkari Met Manohar Joshi: नितीन गडकरींनी घेतली हिंदुजा रुग्णालयात मनोहर जोशींची भेट

By

Published : May 25, 2023, 4:20 PM IST

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत. प्रकृती अस्वस्थ्य असल्यामुळे मागील सोमवारी त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Nitin Gadkari Met Manohar Joshi
गडकरी जोशी भेट

मुंबई:मनोहर जोशींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील सोमवारी हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताना ते गंभीर स्थितीत होते; परंतु त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासत नव्हती. कारण ते स्वतःहून श्वास घेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते; परंतु काल हॉस्पिटलने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये जोशी यांना 'ब्रेन ट्यूमर'मुळे गुंतागुंत निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. त्यांची प्रकृती थोडी चिंताजनक असून ते अर्धचेतन अवस्थेत आहेत. तसेच त्यांचे 'ब्रेन हॅमरेज' स्थिर आहे. हिंदुजा रुग्णालयाने सांगितले की, ते अजूनही 'आयसीयू'मध्ये असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


गडकरींचा महत्त्वाचा वाटा:महाराष्ट्र राज्यात १९९५ ते १९९९ या दरम्यान 'शिवसेना-भाजप' युतीचे सरकार असताना मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. त्याचप्रमाणे जोशींच्या कार्यकाळात नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली होती. याच दरम्यान मुंबई-पुणे महामार्गाची निर्मिती झाली होती. तसेच या काळात राज्यात तयार करण्यात आलेल्या विविध रस्ते-पूल प्रकल्पाच्या विकासात नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो.

आयसीयूमध्ये उपचार सुरू : मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांनी सांगितले की, त्यांचे वडील अजूनही बेशुद्ध आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (85) यांना सोमवारी अर्ध कोमा अवस्थेत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे की, 'मनोहर जोशींची प्रकृती गंभीर असून ते अर्धकोमात आहेत. त्यांचा मेंदूतील रक्तस्राव स्थिर आहे. ते अजूनही अतिदक्षता विभागात (ICU) आहेत. तेथे त्यांची वैद्यकीय व्यवस्था केली जात आहे आणि त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी घेतली भेट: जोशी यांना 22 मे रोजी अर्धकोमा अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते स्वत:हून श्वास घेत होते आणि व्हेंटिलेटरवर नव्हते. त्यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी सांगितले की, त्यांचे वडील बेशुद्ध आहेत आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना थांबा आणि वाट पहा असे सांगितले आहे. ब्रेन हॅमरेजमुळे ते बेशुद्ध झाले आहेत, असे ते म्हणाले. शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हेही वाचा:

  1. Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए अधिकारी नागपुरात दाखल
  2. Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांवर गद्दरांची गाडी चालवण्याचे दिवस; संजय राऊतांचा हल्लाबोल
  3. Molestation Case : अमृता फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ दुसऱया महिलेला पाठवणे पडले महागात; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details