महाराष्ट्र

maharashtra

NCP criticizes BJP : ज्यांच्या वडिलांच्या नावाने महामार्ग झाला, त्या माजी मुख्यमंत्र्यांना तरी आमंत्रण द्यायला हवं होतं - राष्ट्रवादी

By

Published : Dec 11, 2022, 5:36 PM IST

नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या ( Balasaheb Thackeray Prosperity Highway ) लोकार्पणावरुण राष्ट्रवादीने टीका केली आहे. ज्याच्या वडीलांचे नाव महामार्गाला ( Samruddhi Mahamarg ) दिले त्यांना त्यांना तरी निमंत्रण द्याला हवे होते असा चिमटा राष्ट्रवादीने ( Nationalist Congress ) काढला आहे.

NCP criticizes BJP
NCP criticizes BJP

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा ( Balasaheb Thackeray Prosperity Highway ) नागपूर ते शिर्डी असा पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पार पडले यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) भारती पवार राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना आमंत्रण देण्यात आले होते.

महेश तापसे यांची भाजपवर टीका

राष्ट्रवादीची टीका - यावेळी नागपूरच्या मेट्रोचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं. ही सर्व कामे सरकारी कामे होती. त्यामुळे या कार्यक्रमांना विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री यांनाही आमंत्रण देणे एक प्रथा असते. मात्र, या प्रथेला छेद देत सत्ताधारी पक्षांनी केवळ त्यांच्या मंत्री आमदारांना आमंत्रण दिलं. कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. एवढेच काय तर ज्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलं त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते त्यांना तरी किमान या कार्यक्रमाला बोलवायला हवं होतं असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress ) प्रवक्ते महेश तपासे यांनी काढला आहे.


भाजवर आरोप -महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे नेहमीच शासकीय कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही बोलावलं जातं. मात्र याचा पूर्णपणे विसर भारतीय जनता पक्षाला पडला आहे. हे लोकार्पणाची कार्यक्रम मदन काही भारतीय जनता पक्षाची कार्यक्रम असल्यासारखे भारतीय जनता पक्ष वागत आहे असा आरोपी महेश तपासे यांच्याकडून करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details