महाराष्ट्र

maharashtra

Aryan Khan Case : आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकारी बडतर्फ, वर्षभरापासून होता निलंबित

By

Published : May 9, 2023, 7:52 PM IST

विश्व विजय सिंह यांची एनसीबीकडून चौकशी सुरू होती.बहुचर्चीत कॉर्डीलिया क्रुझवरील अमली पदार्थाच्या कारवाईमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणाऱ्या नार्कोटीक कंट्रोल ब्युरोचा अधीक्षक विश्वविजय सिंग यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Aryan khan case
आर्यन खान

मुंबई: एनसीबीने गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. कॉर्डिलिया क्रूज प्रकरणातील ड्रग्स बाळगल्या प्रकरणी कारवाईमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. त्यावेळी एनसीबीचे अधीक्षक विश्वविजय सिंग होते. विश्व विजय सिंग यांना बडतर्फ करण्यात आले आहे. विश्वविजय सिंग हे गेल्या वर्षापासून एका वेगळ्या प्रकरणांमध्ये निलंबित होते.

बडतर्फ करण्यात आले:बहुचर्चीत कॉर्डीलिया क्रुझवरील अमली पदार्थाच्या कारवाईमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणाऱ्या नार्कोटीक कंट्रोल ब्युरोचा अधीक्षक विश्वविजय सिंग यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई एनसीपीचे तत्कालीन विभाग संचालक समीर वानखेडे यांचे नेतृत्वाखाली झाली होती. विश्वविजय सिंग गेल्यावर्षीपासून एका वेगळ्या प्रकरणांमध्ये निलंबित होते. त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.



चौकशी समिती स्थापन: सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान प्रकरणात कारवाई झाली, त्यावेळी वानखेडे यांच्या पथकात असलेल्या विश्वविजय विरोधात शिस्तभंगाच्या तसेच अन्य काही प्रकरणांमध्ये काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. तक्रारी वाढल्यानंतर गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर शिस्तभंगाचा ठपका ठेवत. अखेर सोमवारी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.



आर्यन खानला क्लीन चिट: आर्यन खान प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीपीच्या सात अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात आली. मात्र या चौकशीचा अहवाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. आर्यन खान अटके प्रकरणी त्यावेळी एनसीपीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे देखील वादाच्या भोवऱ्यात फसले होते. त्यानंतर त्यांची चेन्नई येथे ट्रान्सफर करण्यात आली. त्याचबरोबर दुसरीकडे कॉर्डिलीया क्रुझ प्रकरणातील ड्रग्स बाळगल्या प्रकरणी न्यायालयाने देखील आर्यन खानला क्लीन चिट दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र कॉर्डीलिया क्रूज प्रकरणावर अजूनही कोर्टात सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Aryan Khans directorial debut आर्यन खान करणार लवकर बॉलीवुडमध्ये पर्दापण भूमिका माहित झाल्यानंतर वाटेल आश्चर्य
  2. Aryan Khan शाहरुखच्या मुलाने सुरू केला कपड्यांचा व्यवसाय वडिलांना करण्यास सांगितले अ‍ॅक्शन कट
  3. Aryan Khan Drug Case ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता न्यायालयात याचिका दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details