महाराष्ट्र

maharashtra

Nawab Malik: अखेर मलिकांची किडनी तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत होणार, कोर्टाचा निर्णय

By

Published : Jan 19, 2023, 7:08 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर किडनी उपचारावरासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ईडीने याला विरोध दर्शवला होता. तसेच, मलिक यांच्या उपचारासंदर्भात विशेष पथक स्थापन करण्याची मागणी देखील ईडीने केली होती. आज गुरुवार (दि. 19 जानेवारी)रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मलिक यांच्या किडनी संदर्भात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने किडनीची नेफ्ट्रोलॉजिस्टची तपासणी करून यावर 2 फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहे आहेत.

Etv Bharat
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक

मुंबई :आज झालेल्या सुनावणी दरम्यान तपासणीसाठी निर्देश देण्यात आले असून, नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांकडून किडनीतज्ञ 3 नेफ्ट्रोलॉजिस्टची नावे कोर्टासमोर सादर केली आहे आहेत. कोर्ट या तीन तज्ञ डॉक्टरांमधील एक नेफ्ट्रोलॉजिस्ट ठरवणार आहे. नवाब मलिक यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरांचे नाव अद्याप सांगण्यात आले नसून, सविस्तर ऑर्डरमध्ये या संदर्भातील निर्देश देण्यात येणार आहे. या संदर्भातील अहवाल (दि. 2 फेब्रुवारी)पर्यंत कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. तोपर्यंत मलिक यांचा मुक्काम कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयातच राहणार आहे.

सत्र न्यायालयाला विनंती अर्ज : मुंबई सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मलिक यांना कुर्ल्याच्या क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेण्यास मुभा दिली आहे. मलिक हे किडनी विकाराने तज्ञ आहेत. त्रस्त मागील सहा महिन्यांपासून खासगी रुग्णालयात दाखल असून, उपचार शुरू आहेत. खाजगी रुग्णालयातच उपचार घेण्यासाठी मलिकांचा सत्र न्यायालयाला विनंती अर्ज केला होता. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचारावर ईडीने आक्षेप घेतला होता.

नवाब मलिक यांच्यावर आरोप काय? :हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने (1999)मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.

अद्याप या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही : मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, त्यांना अद्याप या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही.

हेही वाचा :नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम 2 फेब्रुवारीपर्यंत वाढला

ABOUT THE AUTHOR

...view details