महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Political Crisis : 'केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवून..', नाना पटोलेंचा भाजपवर मोठा आरोप

By

Published : Jul 2, 2023, 7:55 PM IST

अजित पवारांच्या शपथविधीवरून नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटत आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Nana Patole
नाना पटोले

नाना पटोले

मुंबई : अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीने राज्यात आलेल्या राजकीय भूकंपावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यात चालेलला राजकारणाचा घाणेरडा खेळ जनतेला मान्य नाही. येणाऱ्या काळात या सगळ्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे. केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवून आणि खोटी आश्वासने देवून सत्तेच्या दबावाखाली ज्यांना सामावून घेतले त्यांनाही जनता माफ करणार नाही', असे नाना पटोले म्हणाले.

'जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही' : नाना पटोले म्हणाले की, 'महाराष्ट्रात भारतीय जनचा पक्षाने पुन्हा एकदा तोडफोडीचे राजकारण केले आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे'. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

'भाजपाचा जनाधार घटत आहे' :नाना पटोले पुढे म्हणाले की, 'भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटत आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्येही भाजपाचा दारुण पराभव होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. आगामी निवडणुकीत लाज राखण्यासाठी फोडीफोडीशिवाय भाजपाकडे दुसरा पर्याय नव्हता, अशी टीका पटोलेंनी केली.

'आता शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का?' : नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केला होता. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का?, असा सवाल नाना पटोलेंनी केला. परवाच पंतप्रधान मोदीं राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता नरेंद्र मोदी व फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत, याचे उत्तरही जनतेला द्यावे लागणार, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. NCP Political Crisis : बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला, लवकरच....; शरद पवारांची प्रतिक्रिया
  2. Maharashtra Political Crisis : 'हे सरकार अस्थिर, म्हणूनच फोडाफोडी..', शपथविधीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
  3. Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री! अजित पवारांनी घेतली 3 वर्षांत तिसऱ्यांदा शपथ

ABOUT THE AUTHOR

...view details