महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Traffic Rules : नो हॉर्न प्लीज! विनाकारण हॉर्न वाजवाल तर दंड तर भरावाच लागेल, पण...

By

Published : Nov 19, 2022, 5:38 PM IST

आता विनाकारण हॉर्न वाजवत (No horn please) असाल तर दंड तर भरावा लागेलच, पण त्याबरोबरच दोन ते तीन तास बसून वाहतुकीच्या नियमांचे (Mumbai Traffic Rules) धडे ही गिरगावे (against traffic violators) लागेल, असा गजब नियम मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police will take strict action) काढला आहे.

Mumbai Traffic Rules
मुंबई वाहतूक पोलिस

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने पूर्वीच दुचाकी स्वारासह सहप्रवाश्याला देखील हेल्मेट सक्ती केली. त्यानंतर चार चाकी वाहनांसाठी सक्ती केली असून; गेल्या तीन दिवसात सीट बेल्ट न वापरणाऱ्या 9000 वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केल्याचे समोर आले आहे. त्यातच आता बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांनी कठोर पावले (Mumbai Traffic Police will take strict action) उचलली आहेत. आता विनाकारण हॉर्न वाजवत (No horn please) असाल तर दंड तर भरावा लागेलच, पण त्याबरोबरच दोन ते तीन तास बसून वाहतुकीच्या नियमांचे (Mumbai Traffic Rules) धडे ही गिरगावे (against traffic violators) लागणार आहेत.

वाहतूक पोलिसांनी शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार गाड्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे. तसेच रस्त्यांवर मोठ मोठा आवाज करत शायनिंग मारत फिरणाऱ्या बुलेट चालकांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी शनिवारचे दोन तास नो हाँकिंग म्हणत कारवाई करण्यात आली.



प्रत्येक बुधवार हा नो हाँकिंग डे म्हणून पोलिसांकडून जाहीर करत, त्यानुसार कारवाई देखील करण्यात येत होती. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त चालकांसाठी जनजागृती वर देखील भर देण्यात येत आहे. तरी देखील नियम मोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे.



सुपर बाईक रेसिंग, ऍक्टिवा रेसिंग ,कपल बाईक रेसिंग अशा प्रकारात हे रेसिंग आणि स्टंटबाजी करण्यात येते. याच वेगासाठी लाखोंचा खर्च करून वाहनांमध्ये मॉडिफिकेशन केले जाते. बंगळुरू, चेन्नई, इंडोनेशिया, चीन येथून बाईक साठीचे विविध पार्टस आणण्यात येतात. बाईकमध्ये पाच हजारांचा कार्बोरेटर वीस हजार रुपयांचा बसवण्यात येतो. एक लिटर पेट्रोल मागेही बाईक पाच ते सहा किलोमीटर धावते. आवाज वाढल्या पाहीजे यासाठी, सायलेन्सरवरचे कवर काढण्यात येते, असे मॉडिफिकेशन केले जाते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने, वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

समुद्रकिनारी तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरून जात असताना, अनेकांकडून मोठमोठ्याने कर्कश्य आवाजात गाणी वाजवली जातात. अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. तसेच विना हेल्मेट प्रकरणी 2 महिन्यात तीन लाख 15 हजार 344 गुन्हे नोंद झाले आहेत. तसेच वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विना हेल्मेट कारवाईतील 16 हजार 841 जणांकडून एकूण 22 हजार 828 जणांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी, आरटीओ कडे पाठवण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details