महाराष्ट्र

maharashtra

नवीन वर्षाच्या जल्लोषावर विरजण : मायानगरीत बॉम्बस्फोट घडवण्याची मुंबई पोलिसांना धमकी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 10:18 AM IST

Updated : Dec 31, 2023, 2:14 PM IST

Mumbai Police Threat Call : नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नागरिक मुंबईत धाव घेत आहेत. मात्र मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे.

Mumbai Police Threat Call
संग्रहित छायाचित्र

मुंबई Mumbai Police Threat Call : देशभरात नवीन वर्षाच्या जल्लोषाची तयारी सुरू असून मुंबईत मात्र धमक्यांचं सत्र थाबताना दिसत नाही. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. मात्र अद्यापही या कॉलरचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं नाही. दरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध सुरू केल्याची माहिती मुंबई पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन :मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी 06.30 च्या सुमारास धमकीचा फोन आला. यावेळी कॉलरनं शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. माहिती देऊन तत्काळ या कॉलरनं फोन कट केला. त्यामुळं मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी तत्काळ या कॉलरचा शोध सुरू केला आहे.

मुंबई पोलीस दर सक्षम, कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही :मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी अज्ञात आरोपीकडून देण्यात आली आहे. या धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं आसता, त्यांनी " मुंबई पोलीस अलर्ट आहेत. त्यामुळं कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. इथं कोणतंही बेकायदेशीर काम करण्यास यशस्वी होणार नाही. कोणीही बेकायदेशीर काम करण्याचा प्रयत्न केला, तर कठोर कारवाई करण्यात येईल. असा प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई करण्यास मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यामुळं मुंबईत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही" असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं.

मुंबईत यापूर्वीही धमकीचे कॉल :मुंबई शहरात बॉम्बस्फोट करण्याबाबतचे धमकीचे कॉल शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षास येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही मुंबई पोलीस दलातील नियंत्रण कक्षाला धमकीचे अनेक फोन आले आहेत. मात्र यातील अनेक फोन करणारे कॉलर माणसिक तणावातून फोन केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Police Threat Call: लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची मुंबई पोलिसांना धमकी, फोन करणाऱ्याला तत्काळ अटक
  2. Mumbai Police Threat Call : मुंबई पोलिसांना वारंवार धमकीचे फोन; हॉक्स कॉलिंगची काय आहे गडबड?
Last Updated : Dec 31, 2023, 2:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details