महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर ड्रग्स फॅक्टरी प्रकरणातल्या 'त्या' आरोपीचा मुंबई पोलिसांनी घेतला ताबा

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 8:12 AM IST

Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेनं ऑक्टोबर महिन्यात सोलापूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री शेंकी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीवर मुंबई गुन्हे शाखेनं छापेमारी केली होती. या प्रकरणातील आरोपीची कोठडी मुंबई पोलिसांनी घेतलीय.

Mumbai Crime News
Mumbai Crime News

मुंबई Mumbai Crime News : सोलापूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री शेंकी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीवर मुंबई गुन्हे शाखेनं छापेमारी करून ऑक्टोबर महिन्यात मोठी कारवाई केली होती. या प्रकरणातील श्री शेंकी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर असलेल्या रामागौडा चंद्राय्यागौड इडगी उर्फ राजू गौड याला मोहोळ पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो सोलापूर कारागृहात होता. दरम्यान मुंबई पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटच्या आधारावर राजू गौड या आरोपीची कोठडी मुंबई पोलिसांनी घेतलीय. त्याला न्यायालयात हजर केलं असता 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

कोट्यावधी रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू गौड हा सह आरोपी असलेल्या राहुल गवळी आणि अतुल गवळी यांच्या सोबत श्री शेंकी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एक संचालक आहे. त्यानं या कंपनीसाठी 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. सहआरोपी असलेल्या राहुल आणि अमोल गवळीला तो फंड पुरवत होता. आरोपी राजू गौड हा मूळचा तेलंगणातील झहिराबाद तालुक्यातील रणजोल गावातील आहे.

100 कोटी रुपयांचं सापडलं होतं एमडी-गुन्हे शाखेच्या पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अतुल गवळी आणि राहुल गवळी या दोन आरोपींना कार्टर रोड, वांद्रे इथल्या खार दांडा परिसरातून 1089 ग्राम एमडीसह ऑक्टोबरमध्ये अटक केली होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत 10 कोटी 17 लाख 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आलं होतं. या आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसीमध्ये असलेल्या एका कारखान्यावर ऑक्टोबरमध्ये छापा टाकला होता. छाप्यादरम्यान कारखान्यातून सहा कोटी रुपये किमतीचे तीन किलो एमडी सापडले होते. याशिवाय कारखान्यात एमडी बनवण्याचं रसायन सापडलं होतं, त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे.


दोन भावांना पाच किलो एमडीसह अटक : मुंबई गुन्हे शाखेनं सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसी येथून एमडीची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. यावेळी 16 कोटी रुपयांचं एमडी तसेच शंभर कोटी रुपयांचा कच्चा माल गुन्हे शाखेनं जप्त केला होता. गुन्हे शाखेनं एमडीची विक्री करण्यात आलेल्या राहुल गवळी आणि अतुल गवळी या दोघा भावांना पाच किलो एमडीसह अटक केली होती. त्यांच्या चौकशीत या कारखान्याचा उलगडा होताच गुन्हे शाखेच्या पथकानं सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी इथं रेड करुन कारखाना नष्ट करत तिथून तब्बल तीन किलो एमडी जप्त कोलंं होतं.

एमआयडीसीतच एमडीचा कारखाना-अटक केलेले दोघंही दहावी नापास असून पूर्वी एका केमिकल फॅक्टरीमध्ये काम करत होते. तिथंच त्यांनी एमडी कसं तयार करायचं त्याचा प्रशिक्षण घेतलं. त्यानुसार चिंचोली एमआयडीसी इथं 30 हजार रुपये प्रति महिना भाड्यानं 21 हजार चौरस फुटी जागा घेऊन तिथं एमडी बनवण्याचा श्री शेंकी नावाचा कारखाना थाटला. गवळी बंधू दोघंही पश्चिम उपनगरात एमडी विकत असल्याचं तपासात समोर आलंय. कारखान्यात 3 ते 4 मोठे निळे ड्रम आणि 48 गोणी केमिकल्स जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 100 कोटी आहे. यात मॅथीनोल, सॉल्वन, ऍसिटोल आणि हायड्रोक्लोराईड नावाच्या केमिकल्सचा समावेश आहे. या केमिकल्समधून दुर्गंध खूप येत असल्याकारणानं केवळ एमआयडीसीतच एमडीचा कारखाना थाटला जातो. जेणेकरून दुर्गंध एमआयडीसी परिसरात हवेत सोडला जाऊ शकतो, असं एका अधिकाऱ्यानं ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा :

  1. Drugs seized : अंधेरीत ड्रग्स विक्रेत्यास अटक; 2 कोटी 85 लाख रुपयाचे ड्रग्स जप्त
  2. Mumbai Crime: मुंबईत दहा लाखांचे एमडी ड्रग्स बाळगणाऱ्यास अटक, विक्रीसाठी होता फिरत

ABOUT THE AUTHOR

...view details