महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut On Narayan Rane : कोकण नारायण राणेंच्या बापाचे आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल, राणे म्हणाले, येऊन तर दाखवा...

By

Published : Apr 29, 2023, 6:50 PM IST

नाणार येथील रद्द झालेला तेल शुद्धीकरण कारखाना राजापूर तालुक्यातील बारसू येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण व माती परीक्षण सुरू आहे. मात्र, याला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे लवकरच बारसूला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. त्यावर संजय राऊत यांनी हल्लाबोल करीत कोकण नारायण राणेंच्या बापाचे आहे का? असा प्रहार केला आहे.

Sanjay Raut On Narayn Rane
Sanjay Raut On Narayn Rane

मुंबई : कोकणात वीजनिर्मिती प्रकल्प होऊ नयेत, यासाठी ठाकरेंनी 34 उद्योजकांकडून 5 कोटींची आगाऊ रक्कम घेतली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ठाकरे फक्त पैसे कमवायचे काम करुन इतरांना त्रास देण्याचे काम करतात असेही नारायण राणे म्हणाले. ठाकरेंनी कोकणात येण्याची तारीख जाहीर करावी. त्यांनी कोकणात येऊनच दाखवावे. आम्ही इथे आलो आहोत, बघू काय होते ते असे नारयण राणेंनी म्हटले आहे. चालण्याची ताकद नसणाऱ्यांनी पळण्याचा विचार करु नये, त्यांना कोकणातून मुंबईत जाण्यासाठी किती किमी. पळावे लागेल यांची माहिती नसणाऱ्यांनी कोकणाच्या नांदाला लागू नये अशी टीका राणे यांनी ठाकरेंवर केली आहे.

कोकणात आपला दोनदा पराभव : यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कोकण नारायण राणेंच्या बापाचं आहे का?बघ कुठे पाय आहेत ते. तुम्ही काय आणि कोणाशी बोलताय? तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. त्यामुळे तुम्ही हार मानू नका, कोणाची दलाली करत आहात? तुम्ही एकदा कोकणात नाही तर दोनदा पराभूत झालात. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, सन्मानाने जगा. महाराष्ट्राची प्रतिष्ठा खराब करू नका," संजय राऊत नारायण यांना म्हणाले. राणे.

सरकारच्या डोळ्यात मोतीबिंदू:'जर सरकार म्हणतो की बारसूत अंदोलकांवर लाठीहल्ला झालेला नाही, कुठेही अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या नाही. सरकारला या घटना दिसत नसतील तर त्याच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे का? असा सवास खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. जर तुम्हाला काहीच दिसत नसेल तर डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी अशी टीका राऊत यांनी केली आहेआंदोलकांना न्यायालयात नेले जात असताना राजापूरच्या न्यायालय परिसरात पोलिसांचा एवढा बंदोबस्त होता की, जणू दहशतवाद्यांना नेले जात आहे,' अशी टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे.

हेही वाचा - Nana Patole On APMC Result : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालांनी भाजपविरोधात जनक्षोभ - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details