महाराष्ट्र

maharashtra

Monsoon Health Tips: आला पावसाळा, तब्येत सांभाळा! पावसाळ्यात आरोग्याची घ्या काळजी

By

Published : Jun 24, 2023, 6:58 PM IST

Updated : Jun 24, 2023, 7:25 PM IST

ऋतू बदलला की सगळ्यात आधी त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. पावसात भिजल्याने आरोग्य बिघडते. या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात आरोग्याकडे अधिक भर देणे गरजेचे आहे.

Monsoon Health Tips
आरोग्याची काळजी

माहिती देताना डॉ. सागर कोल्हे

मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसापासून उकाडा जाणवत असल्याने, मुंबईकर हैराण झाले होते. शनिवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात थोडासा गारवा जाणवत आहे. पावसाळा सर्वांचा आवडता ऋतू आहे. मात्र पावसाळा सुरू होताच अनेक आरोग्य विषयी समस्या डोकेवर काढू लागतात. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असतो. पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या दूषित पाण्यापासून विविध आजार पसरत असतात. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात योग्य प्रकारे आहाराचे सेवन करायला पाहिजे.




कोणते आजार होऊ शकतात : डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, सर्दी, खोकला, पडसे, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, पायाला चिखल्या पडणे, जुलाब होणे, दूषित पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसीस, कावीळ हे आजार होतात.

पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात थोडासा गारवा जाणवत आहे. पावसामुळे अचानक वातावरणात बदल होतात. थंडी वाढते, ताप, खोकला, अंगदुखी, यांचे प्रमाण वाढते. अशावेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधे घेऊ नका -डॉ. सागर कोल्हे



पावसाळ्यात हे करू नका :थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचा मोह टाळला पाहिजे. सुका मेवा जास्त खाणे टाळा. कांदा, लसूण, पालक, मुळा, खाणे टाळावे. रस्त्यावरील तेलकट पदार्थ खाणे टाळावे. तेलकट, फास्ट फुड, शेंगदाणे, भगर खाणे टाळावे.

पावसाळ्यात हे करू नका



पावसाळ्यात हे करा :हलका पण पौष्टिक आहार घ्यावा. बेसन लाडू, टोमॅटो, वांगी, कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे वापर करावा. दररोजच्या जेवणात फळे, सलाड व ज्यूसचा वापर करा, चहात आले टाका.

पावसाळ्यात हे करा



लेप्टोस्पायरोसीस होण्याची शक्यता जास्त : प्रत्येक वर्षी मुंबई शहर पावसळ्यात तुंबई शहर बनते तरी देखील मुंबई कधी थांबली नाही. यातून मुंबईकर वाट काढत मार्गस्थ होत असतो. या साचलेल्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसीस होण्याची शक्यता जास्त असते. साचलेल्या पाण्यात कुत्रा आणि उंदीर यांचे मूत्र असते. पायाला जखमा झालेल्यांना पटकन लेप्टोस्पायरोसीस होऊ शकतो. मिळालेल्या माहिती नुसार, मागील सहा महिन्यात ३७० लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण आढळून आले आहेत.

पावसाळ्यात होणारे आजार

अशी घ्या काळजी: मुंबई महापालिकेकडून दरवर्षी आवाहन केले जाते, खाण्यापूर्वी हात स्वच्च धुवा, सार्वजनिक ठिकाणी वावरत असतांना चेहऱ्याला, डोळ्यांना, नाकाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. साचलेल्या पाण्यातून, डबक्यातून चालणे टाळावे. पावसामुळे अचानक वातावरणात बदल होतात. थंडी वाढते, ताप, खोकला, अंगदुखी, यांचे प्रमाण वाढते. अशावेळेस डॉक्टरांनाचा सल्ला घ्या. स्वतःहून औषधे घेऊ नका असे आवाहन डॉ. सागर कोल्हे यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Monsoon Food Tips : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये? घ्या जाणून
  2. Pregnancy Safety Tips : गर्भवती महिलांनी 'या' गोष्टींची घ्यावी काळजी, मातासह अर्भकाचे जीवन राहते सुरक्षित
  3. Women Take Care Of Herself : कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांनी अशी घ्यावी आरोग्याची काळजी ; अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Last Updated : Jun 24, 2023, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details