महाराष्ट्र

maharashtra

Karnatak dispute : मनसे आक्रमक; कर्नाटक सरकारची जाहिरात करणाऱ्या बेस्ट बसला फासले काळे

By

Published : Dec 9, 2022, 9:44 AM IST

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. कर्नाटक संघटनांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना सातत्याने धमक्या ( Constant threats to the leaders of Maharashtra ) येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक ( Maharashtra Navnirman Sena aggressive ) झाली असून मनसे पदाधिकार राजेश सावंत यांनी बेस्ट बसला काळे फासले.

MNS aggressive against Karnataka
कर्नाटक सरकारची जाहिरात करणाऱ्या बेस्ट बसला फासले काळे

मुंबई :महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न ( Maharashtra Karnataka Boundary Question ) दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. कर्नाट मधील संघटनांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना सातत्याने धमक्या ( Constant threats to the leaders of Maharashtra ) येत आहेत. महाराष्ट्रातील गाड्यांवर कर्नाटकमध्ये सातत्याने हल्ले होत आहेत. या प्रश्नावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक ( Maharashtra Navnirman Sena aggressive ) झाली आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ( MNS workers took to the streets ) आहेत. मुंबईच्या घाटकोपर येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या पर्यटनाची जाहिरात करणाऱ्या बेस्ट बसला काळ फासले.


मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर :याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील मनसे पदाधिकार राजेश सावंत यांनी बेस्ट बसला काळे फासले. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईच्या ज्या बेस्ट बसला काळ फासण्यात आले त्या गाडीवर कर्नाटक सरकारच्या पर्यटनाची जाहिरात करण्यात आली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत गाडीला काळपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या सरकारचा निषेध केला.

कर्नाटक विरोधात मनसे आक्रमक


राज ठाकरेंनी दिला होता इशारा :आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक सीमावाद मिटवण्याच आवाहन केलं होते. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बेताल वक्तव्य पाहता महाराष्ट्राच्या दिशेने उठणारी बोट वेळेत मुरगळली जातील असा थेट इशाराच दिला होता. राज ठाकरे यांनी पत्र लिहून हा थेट इशारा कर्नाटक सरकार व राज्य सरकारला दिला होता.


महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगळली जातील :अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपे नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगळली जातील हे बघावे. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावे.


आव्हान स्वीकारायला मनसे तयार :मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे. आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिंची कुलदैवत महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचे हित आहे. असे देखील राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details