महाराष्ट्र

maharashtra

मुंबई; मीरा रोड परिसरात ७ सिलेंडरचा स्फोट, पाहा व्हिडिओ

By

Published : Feb 8, 2021, 8:21 AM IST

Updated : Feb 8, 2021, 11:23 AM IST

मीरा रोड येथील प्रेमनगर परिसरातील एका मैदानात एचपी गॅस सिलेंडरने भरलेल्या दोन ट्रकला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीमुळे एक-एक करुन जवळपास सात सिलेंडरचा स्फोट झाला.

मीरा रोड परिसरात ७ सिलेंडरचा स्फोट
मीरा रोड परिसरात ७ सिलेंडरचा स्फोट

मुंबई- शहरात आज (सोमवार) दोन ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत मीरा रोड परिसरात गॅस सिलेंडरने भरलेल्या दोन ट्रकला आग लागली तर दुसऱ्या घटनेत अंधेरीतील MIDC कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनांमध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मीरा रोड परिसरात ७ सिलेंडरचा स्फोट

गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग
मीरा रोड येथील प्रेमनगर परिसरातील एका मैदानात एचपी गॅस सिलेंडरने भरलेल्या दोन ट्रकला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीमुळे एक-एक करुन जवळपास सात सिलेंडरचा स्फोट झाला. घटनास्थळी मीरा-भाईंदर मनपा अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तर अंधेरी येथील MIDC कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Last Updated : Feb 8, 2021, 11:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details