महाराष्ट्र

maharashtra

कोकण रेल्वे लवकरात लवकर पुर्ववत करा - मंत्री रावसाहेब दानवे

By

Published : Jul 23, 2021, 7:24 PM IST

कोकणात रेल्वेची सेवा लवकरात लवकर सुरू झाल्यास चिपळूण, संगमनेर आणि तळकोकणात मदत कार्याला वेग येईल. त्यामुळे रेल्वे तातडीने पुर्ववत करण्यासाठी काम करण्यात यावे, याबाबत आवश्यक सूचना त्यांनी केल्या आहेत.

रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे

मुंबई-कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला दिले आहे. जेणेकरून कोकणातील पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग येईल.

रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या सूचना -

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांनी आज नवी दिल्ली येथे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन कोकणातील पूर परिस्थिती आणि रेल्वे, तसेच मुंबईत दरवेळी निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि रेल्वेच्या दळणवळणावर होणारे परिणाम याबाबत चर्चा केली. याबाबत दानवे यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांची तातडीने आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कोकणात रेल्वेची सेवा लवकरात लवकर सुरू झाल्यास चिपळूण, संगमनेर आणि तळकोकणात मदत कार्याला वेग येईल. त्यामुळे रेल्वे तातडीने पुर्ववत करण्यासाठी काम करण्यात यावे, याबाबत आवश्यक सूचना त्यांनी केल्या आहेत.

कोकणात गणेशोत्सवासाठी अजुन 40 गाड्या-

कोकणात गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने सोडलेल्या 72 गाड्या फुल झाल्यामुळे अधिकच्या गाड्यांची मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार अजून 40 गाड्यांची घोषणा आज दिल्लीतून रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यामुळे आता गणेशोत्सवासाठी 112 गाड्या उपलब्ध होणार आहेत. तसेच त्यानंतरही जर प्रतीक्षा यादी वाढल्यास गाड्यांची संख्या लाढविण्यात येईल, असेही मंत्री दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. कोकणवासीयांना तातडीने न्याय दिल्याबद्दल रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार आशिष शेलार यांनी आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details