महाराष्ट्र

maharashtra

local bodies election स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही!

By

Published : Oct 26, 2022, 1:42 PM IST

राज्य विधानसभेच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ( local bodies elections of Maharashtra ) राज्यात सत्तांतर नाट्य सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळावधीनंतर आता शिंदे -फडणवीस ( Shinde Fadnavis governmen diffreneces ) सरकार सत्तेवर आले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहे

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मतभिन्नता
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मतभिन्नता

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुकांचा बार येत्या जानेवारीत उडणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणुकींच्या वृत्ताला दुजारा ( Maharashtra political news ) दिला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांचा सर्वस्वी निर्णय निवडणूक आयोगाकडे असल्याचे स्पष्ट केले.



राज्य विधानसभेच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ( local bodies elections of Maharashtra ) राज्यात सत्तांतर नाट्य सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळावधीनंतर आता शिंदे -फडणवीस ( Shinde Fadnavis government differences ) सरकार सत्तेवर आले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मुंबईसह 15 महापालिकांमध्ये प्रशासक नेमण्यात आले आहेत. या ठिकाणी निवडणुका कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुकीबाबत छेडले असता, मुंबई पालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट केले. वर्षा निवासस्थानी दिवाळीनिमित्त ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात ( Devendra Fadnavis on local bodies election ) आले असता, निवडणूक आयोग आणि न्यायालय निवडणुका घेण्यावर शिक्कामोर्तब करतील, असे सांगितले. तसेच महापालिकांवर अनिश्चित काळासाठी प्रशासक राहणे लोकशाहीसाठी योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.


खड्डेमुक्त रस्ते बनवणारमुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते आणि मुंबई एक सुंदर शहर. वर्क ऑर्डर मिळताच मुंबईतील पाच हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री झाल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना, रस्त्यांवरील सततच्या खड्ड्यांबाबत जाब विचारला. तसेच आगामी काळात ही परिस्थिती बदलण्यासाठी मेगा आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षात, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पामुळे मुंबईत खड्ड्यांचा प्रश्न सोडवला जाईल. ज्यामुळे शहराच्या सुशोभीकरण प्रकल्पाला हातभार लावण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.


नोव्हेंबरमध्ये आयोगासमोर होणार सुनावणीशिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कोणाची हा वाद उफाळून आला आहे. निवडणूक आयोगाने तात्पूरत्या स्वरुपात चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह मशाल देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि चिन्ह ढाल आणि तलावर दिले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details