महाराष्ट्र

maharashtra

Mega Block On Three Routes : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; लोकलचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा !

By

Published : May 13, 2022, 8:52 PM IST

Mega Block
मेगाब्लॉक ()

रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी तीनही रेल्वे मार्गावर रविवारी 15 मे रोजी मेगाब्लॉक (Megablocks on all three railway lines) घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक पाहुनच घराबाहेर पडणे ( Get out of the house just by looking at the local schedule!) सोईचे जाणार आहे.

मुंबई:मध्य रेल्वेमार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सर्व लोकल सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाऊन मार्गावर वळविण्यात येतील.

या लोकल सेवा आपल्या नियोजित वेळे पेक्षा 15 मिनिटे उशिराने पोचतील. ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यत सुटणाऱ्या अप धीम्या सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शिव या स्थानकांवर थांबून पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. नियोजित वेळे पेक्षा 15 मिनिटे उशिराने पोचतील.


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11. 10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आले आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते 3.54 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.


तथापि ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेल या स्थानकादरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे, वाशी नेरूळ स्थानकातून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.


पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक : रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवर मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत असणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. याशिवाय अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत

हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत १५५ नवे रुग्ण, १ मृत्यूची नोंद.

ABOUT THE AUTHOR

...view details