महाराष्ट्र

maharashtra

Navi Mumbai Police Covid Infected : नवी मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव.. तब्बल 'इतके' पोलीस अधिकारी, कर्मचारी झाले बाधित

By

Published : Jan 9, 2022, 9:49 PM IST

नवी मुंबई पोलीस दला
नवी मुंबई पोलीस दल ()

राज्यभरात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाचा फटका नवी मुंबई पोलीस दलालाही बसला आहे. नवी मुंबई पोलीस दलातील १०२ पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले ( Navi Mumbai Police Covid Infected ) आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिजित शिवथरे ( DCP Abhijit Shivthare ) यांनी दिली.

नवी मुंबई : कोरोना योद्धयांची भूमिका बजावणारे नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ लागली ( Navi Mumbai Police Covid Infected ) आहे. गत आठवडाभरामध्ये 102 पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित झाले आहेत. यात 22 पोलीस अधिकारी व 80 कर्मचाऱ्यांचा समावेश असून, यातील 9 पोलिसांवर विविध रुग्णांलयात तर उर्वरीत सर्व पोलीस होम क्वॉरंटाईन राहून उपचार घेत आहेत. या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) अभिजीत शिवथरे ( DCP Abhijit Shivthare ) यांनी दिली.

दुसऱ्या लाटेत १२ जणांचा मृत्यू

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या ( Covid Second Wave ) वेळी नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे दोन हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले होते. दुर्दैवाने यातील 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ( Covid Third Wave ) कहर सुरु आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने कोरोना बाधित रुग्णसंख्येत देखील प्रचंड वाढ होऊ लागली ( Covid Spread In Maharashtra ) आहे. यात कोरोना योद्धयाची भुमिका बजावणारे नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारीदेखील पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. गत चार दिवसापासून नवी मुंबई पोलीस दलातील 80 पोलिस कर्मचारी व 22 अधिकारी अशा एकुण 102 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. यातील 9 बाधित पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरित पोलिसांवर घरीच होम क्वारंटाईनमध्ये उपचार सुरु आहेत. यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रकृती व्यवस्थित असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

९८ टक्के लसीकरण पूर्ण

नवी मुंबई पोलीस दलातील 98 टक्के पोलिसांचे लसिकरण पूर्ण झाले ( Navi Mumbai Police Covid Vaccination ) असून, दोन्ही डोस घेतलेल्या व 39 आठवडे पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना बुस्टर डोस ( Covid Vaccine Booster Dose Police ) देण्याची तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त अभिजीत शिवथरे यांनी दिली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उपायोजना करुन त्यांना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या साधनसामुग्री पुरविण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे. यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एन-95 चे मास्क व सॅनिटाईजरचे वाटप करण्यात येत आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणे, शाखा, पोलीस मुख्यालय, सर्व पोलीस ठाण्यात सॅनिटाइझ करणे, पोलीस आयुक्तालयात व मुख्यालात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला सॅनिटाईज व तपासणी केल्यांनतरच प्रवेश देणे, अशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येत असल्याचेही पोलीस उपआयुक्त शिवथरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details