महाराष्ट्र

maharashtra

अँटिलिया प्रकरण : गुजरातमधून चौथ्या आरोपीला अटक

By

Published : Mar 30, 2021, 5:46 PM IST

क्रिकेट बुकी नरेश गोर याच्याकडून विनायक शिंदे याने सिम कार्ड घेऊन सचिन वाझेंना दिल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. गुजरात मधील हे बनावट सिम कार्ड किशोर ठक्कर याच्या मार्फत मिळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

अँटिलिया प्रकरण
अँटिलिया प्रकरण

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात आतापर्यंत नरेश गोर , विनायक शिंदे आणि सचिन वाझे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशातच यासंदर्भात आणखीन एक आरोपी किशोर ठक्कर याला महाराष्ट्र एटीएसकडून गुजरात येथून अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा ताबा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे(एनआयए) देण्यात आला आहे.

एटीएस कारवाई

सचिन वाझे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ठेवण्यासाठी काही बनावट सिम कार्ड गुजरातमधून नरेश गोर या क्रिकेट बुकीच्या माध्यमातून मागविले होते. हे सिम कार्ड क्रिकेट बुकी नरेश गोर याच्याकडून विनायक शिंदे याने घेऊन सचिन वाझेंना दिल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. गुजरात मधील हे बनावट सिम कार्ड किशोर ठक्कर याच्या मार्फत मिळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात किशोर ठक्कर याच्या एका नातेवाईकाला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितल्या जात आहे. दरम्यान , या प्रकरणातील आरोपी नरेश गोर व विनायक शिंदे या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत करण्यात आलेली आहे. या दोघांवरही यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा-छातीत दुखत असल्याची सचिन वाझेची तक्रार, मधुमेहाचा आहे त्रास, 'जेजे'त केले दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details