महाराष्ट्र

maharashtra

Manisha Kayande On Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा - मनीषा कायंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 9:53 PM IST

Manisha Kayande On Nitish Kumar : विधानसभेत महिलांचा जाहीर अपमान करणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Nitish Kumar Resignation) द्यावा. तसंच इंडिया अलायन्समधील सहभागी महिला नेत्यांनीही नितीश कुमार यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करावा, अशी मागणी करत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने जोरदार निदर्शन मुंबईत केली.

Nitish Kumar
मुख्यमंत्री नितीश कुमार

प्रतिक्रिया देताना मनिषा कायंदे

मुंबईManisha Kayande On Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य (CM Nitish Kumar Contradictory Statement) केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी सभागृहात हे वक्तव्य केलं असून या वक्तव्याबद्दल त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला (Nitish Kumar Resignation) पाहिजे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी आज मुंबईत केली आहे. तत्पूर्वी शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. नितीश कुमार यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी ही या महिलांनी केली. त्यानंतर बोलताना मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.



हा कसला पंतप्रधान पदाचा चेहरा: इंडिया अलायन्समध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांचा नाव घेतलं जातं. महिलांचा अपमान करणारा हा कसला पंतप्रधान पदाचा चेहरा अशा शब्दात कायंदे यांनी टीका केली आहे. तसंच या विरोधात इंडिया अलायन्समधील सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) या महिला नेत्यांनी आता का नाही काही प्रतिक्रिया व्यक्त केली? असा सवालही कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

नितीश कुमार यांच्या विरोधात बोललं पाहिजे :ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही आता आपली यासंदर्भातील प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. महिलांप्रती त्यांना जर काही संवेदना असतील तर, त्यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात बोललं पाहिजे असंही मनीषा कायंदे म्हणाल्या.

काय आहे प्रकरण :बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ७ नोव्हेंबर रोजी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलताना अत्यंत बेताल वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी नितीश कुमारांना विवेकहीन म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'नितीश कुमार यांची बुद्धी भ्रष्ट झाली, त्यांनी संपूर्ण मातृशक्तीचा अनादर केला', असं अश्विनी चौबे म्हणाले.

नितीश कुमारांनी माफी मागितली : या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर नितीश कुमारांनी मंगळवारी माफी मागितली. 'माझ्या वक्तव्यानं कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्ही महिलांच्या उत्थानासाठी सातत्यानं काम करत आहोत, असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या वक्तव्याचा बचाव केला आहे. 'मुख्यमंत्री फक्त लैंगिक शिक्षणावर बोलत होते. त्यांच्या वक्तव्याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाही, असं तेजस्वी यादव म्हणाले.

हेही वाचा -

  1. Narendra Modi : 'नितीश कुमारांना काही लाज वाटत नाही', लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून मोदींचा हल्लाबोल
  2. Nitish Kumar : नितीश कुमारांच्या अडचणी वाढल्या, महिलांबद्दलच्या असभ्य टिप्पणी प्रकरणी तक्रार दाखल; 'या' दिवशी सुनावणी
  3. CM Nitish Kumar Apologized : मुख्यमंत्री नितिश कुमारांचा 'त्या' वक्तव्यावरुन माफीनामा, पहा काय म्हणाले?

ABOUT THE AUTHOR

...view details