महाराष्ट्र

maharashtra

Naan Recipe : घरच्या घरी बाजारासारखे नान बनवा, पाहा रेसिपी बटर नान रेसिपी

By

Published : Oct 31, 2022, 2:12 PM IST

पाहूणे आल्यावर प्रत्येक घरात काही खास पदार्थ तयार केले जातात. पुलाव, भाजी, गोड अशा अनेक पदार्थांची यादी तयार असते. पण अनेकदा या सगळ्यांसोबत तिथे चपाती, पराठा बनवायचा कि पूरी बनवली हे समजत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाजारासारखे नान कसे बनवायचे ( restaurant style naan at home ) हे सांगणार आहोत. तुम्ही दोन प्रकारच्या नानची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Naan Recipe
नान

मुंबई :पाहूणे आल्यावर प्रत्येक घरात काही खास पदार्थ तयार केले जातात. पुलाव, भाजी, गोड अशा अनेक पदार्थांची यादी तयार असते. पण अनेकदा या सगळ्यांसोबत तिथे चपाती, पराठा बनवायचा कि पूरी बनवली हे समजत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाजारासारखे नान कसे बनवायचे ( restaurant style naan at home ) हे सांगणार आहोत. तुम्ही दोन प्रकारच्या नानची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नान बनवण्यासाठी साहित्य : दोन वाट्या मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, एक टीस्पून तेल, दही, एक टीस्पून साखर, लोणी. इत्यादी साहित्यांचा वापर आज केला Ingredients for making naan जातो.

बटर नान कसा बनवायचा : नान बनवण्यासाठी थोडीशी आगाऊ तयारी करावी ( Butter Naan Recipe ) लागते. बाजारासारखे नान घरी बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या. नंतर त्यात दही घाला. मीठ, बेकिंग सोडा आणि साखर एकत्र मिसळा. या सर्व गोष्टी मिसळा. आता कोमट पाणी घेऊन पीठ मळून घ्या. पीठ खूप मऊ मळून घ्या. पीठ गरम पाण्याने मळले की हाताला तेल लावून पीठ आणखी चांगले मळून घ्या. लक्षात ठेवा की नान बनवताना पीठ भरपूर मळावे लागते. जेणेकरून ते पूर्णपणे मऊ होते आमि नान बनतात. आता हे पीठ झाकून ठेवा. साधारण दोन ते तीन तासांनंतर तुम्हाला दिसेल की हे पीठ जास्तच फुगले आहे. नंतर या पिठाचे गोळे कापून घ्या. गोळ्यांचे नान लाटून घ्या. नंतर एका बाजूला पाणी लावा. पॅन गरम करा. नंतर लाटलेल्या नानचा ओला पृष्ठभाग तव्यावर ठेवा आणि उलटा करा. नान चांगले भाजून घ्या. त्यावर बटर लावून गरमागरम सर्व्ह करा.

लसूण नान कसा बनवायचा :लसूण नान बनवण्यासाठी नान सारखीच तयारी ( Garlic Naan Recipe ) करा. पिठाचा गोळा बनवा आणि रोल करा. नंतर त्याच्या एक बाजू पाणी लावून ओला करा. त्यावर बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर लावा. रेग्यूलर नान सारखे ते बेक करा. स्वादिष्ट गार्लिक नान तयार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details